"मागेल त्याला सौरपंप;' 748 जणांना लाभ:3065 शेतकऱ्यांनी केले कोटेशन सादर, शेतात बसवण्यात येतील सौर पंप

2 hours ago 2
शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौरऊर्जा निर्मिती पॅनल्स व कृषिपंपांचा लाभ दिला जातो. सहा महिन्यात परिमंडळातील शेतकऱ्यांकडून या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे योजनेसाठी सहा महिन्यांत ३०६५ शेतकऱ्यांनी कोटेशन सादर केले आहे. यापैकी ७४८ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित शेतात लवकरच पंप बसवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा विद्युत पंपावर होणारा खर्च कमी करावा आणि सहजपणे दिवसा वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौरपंप योजनेतून दहा टक्के अनुदानावर सौरऊर्जा निर्मिती पॅनल्स व कृषिपंपाचा लाभ दिला जातो. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत सर्वसाधारण शेतकऱ्यांना दहा टक्के तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. दिवसा वीजपुरवठा आणि लोडशेडिंग किंवा बिलाची चिंता नाही, असे सौर कृषिपंपांचे वैशिष्ट्य असल्याने शेतकऱ्यांकडून या योजनेतून सौरपंपाची मागणीही केली जात आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पीएम कुसुम या योजनेच्या आधारे मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार महावितरणकडे आतापर्यंत ४०६५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३०६५ शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्शाची रक्कम भरली आहे. त्यापैकी ७४८ शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसविण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतात लवकरच पंप बसवण्यात येतील. इच्छुक शेतकरी ४०९५ अर्ज सादर ४०६५ कोटेशन सादर ३०६५ लाभार्थी ७४८ असा करता येईल अर्ज महावितरणने मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी अर्ज करण्यास स्वतंत्र वेबसाइट सुरू केली . त्यावर नव्याने दाखल झालेल्या अर्जांवरही काम सुरू आहे. राज्य सरकारचे दहा लाख सौर कृषीपंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे . शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीने ते साडेसात एचपीपर्यंत पंप मंजूर दिली जाते. सौर उर्जा निर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसवला की शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article