माढा मतदारसंघात चुरशीने 70 टक्के मतदान:मतदान केंद्रांवार सकाळी निरुत्साह, दुपारनंतर लागल्या रांगा, 2019 पेक्षा अर्धा टक्क्यांनी वाढ

10 hours ago 1
माढा विधानसभा मतदार संघातील ६ गावात अजुनही मतदानाची प्रकिया सुरुच आहे. मतदार संघातील उपळाई,चव्हाणवाडी(टे) ,भुताष्टे, उंदरगाव, मानेगाव, अंजनगाव, पिंपळनेर या गावात अजुनही मतदानासाठी मतदाराच्या रांगा लागल्या आहेत.सध्या देखील मतदान सुरुच असुन 9 वाजे पर्यत मतदान सुरु राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रतिनिधी |माढा माढा विधानसभा मतदारसंघात ७०.३६ टक्के मतदान झाले. यामध्ये पुरुष १ लाख ३१ हजार ६८३ तर १ लाख १६ हजार ४८२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. माढा विधानसभा मतदारसंघात ३५५ मतदान केंद्रावर सकाळपासून संथगतीने मतदान सुरु झाले सकाळी नऊ वाजेपर्यंत अवघे पावणे पाच टक्के तर अकरा पर्यंत सव्वा ११ टक्के इतके मतदान झाले. दुपारी एक वाजता २६.३१ टक्के इतके मतदान झाले होते.दुपारी ३ नंतर मतदानाचा टक्का वाढला. ेतातील काम आटोपून शेतकऱ्यांनी मतदान करण्यास पंसती दर्शवली. त्यामुळे अचानकच मतदान केंद्रावर गर्दी झाली. माढा तालुक्यातील पूर्व भागात सकाळपासून मतदानाचा वेग अगदीच कमी होता. सकाळी मतदारांमध्ये निरुत्साह जाणवत होता. दुपारी तिन नंतर मतदानाचा वेग वाढला. महाविकास आघाडी, महायु ीकडून व अपक्ष उमेदवारांच्या समर्थक ांकडून मतदानासाठी मतदारांना विनवणी करुन मतदानासाठी बाहेर काढण्यात येत होते. उपळाईत तक्रारीवरुन काही काळ गोंधळ माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे मतदान केंद्रात अनेक लोक जात असल्याच्या जाण्यावरुन झालेल्या तक्रारीवरून महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांचेकडे त्यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली काही वेळात पाटील मतदान केंद्रावर हजर झाले यावेळी ते बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर चांगलेच भडकले.स्थानिक स्तरावराच्या कार्यकर्त्यांच्या किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया मतदार संघात शांततेत झाली. माढा विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये ६९.५५ टक्के मतदान झाले होते. यंदा अर्धा टक्के मतदान वाढल्याचे दिसून आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article