बॉलिवूडमध्ये अभिनेत्री यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगू लागते. अभिनेत्रीने किती आणि कोणत्या सेलिब्रिटींना डेट केलं, तिची संपत्ती, लाईफस्टाईल… असंख्य गोष्टी चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात… बॉलिवूडमध्ये देखील अशी एक अभिनेत्री होऊन गेली, जी खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे शेवटपर्यंत चर्चेत राहिली. ती अभिनेत्री आत्मा दिसायच्या आणि तिच्या निधनानंतर फक्त चाहत्यांनाच नाही तर, संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं.
अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील फिदा होते. 70 व्या दशकात अभिनेत्रीने अनेक ग्लॅमरस सीन दिले आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्रीचा सर्वांसमोर सिगरेट पिण्याचा अंदाज देखील चर्चेत राहिला. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे तिने 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चारित्र्य’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पंण केलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री परवीन बाबी होती.
हिंदी सिनेविश्वाची ग्लॅमरस गर्ल
परवीन पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजबूर सिनेमात झळकल्या. परवीनने तिच्या सुरुवातीच्या सिनेमांपासूनच स्वतःच्या सौंदर्याची जादू प्रेक्षकांवर पाडण्यास सुरुवात केली होती. परवीनच्या अभिनयातच ग्लॅमर होता. परवीनने अनेक सिनेमांमध्य मुख्य भूमिका साकारली.
हे सुद्धा वाचा
परवीनने 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन स्टारर ‘दीवार’ हीट सिनेमात मुख्य भूमिका साकारली. प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाल्यानंतर परवीनने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर परवीनने अकबर एंथोनी (1977), सुहाग (1979), काला पत्थर (1979), द बर्निंग ट्रेन (1980), शान (1980), क्रांति (1981), कालिया (1981) आणि नमक हलाल (1982) यांसारखे हीट सिनेमे बॉलिवूडला दिले.
अभिनेत्रीचे रिलेशनशिप
परवीनच्या नावाची चर्चा अमिताभ बच्चन, कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत रंगली. पण बिग बी यांनी कधीच अभिनेत्रीसोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं नाही. पण अभिनेते कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत अभिनेत्रीच्या नावाची चर्चा तुफान रंगली.
परवीनला पॅरानोइड स्किझोफ्रेनिया या असाध्य आजाराने ग्रासले होते. हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्याचा छळ होत आहे. त्याचवेळी कबीर बेदी यांनी सांगितले होते की, परवीन लहानपणापासूनच मानसिक आजारी होती.
अभिनेत्याने असंही सांगितलं की, परवीनचे पूर्वज पश्तून होते, त्यांनी मुघल साम्राज्यात काम केलं होतं. कबीर बेदींनी सांगितले होते की, परवीनला आत्मा दिसायच्या…
कसा झाला अभिनेत्रीचा मृत्यू?
20 जानेवारी 2005 मध्ये परवीनचं मृत्यू झाला. मृत्यूनंतर जवळपास तीन दिवस अभिनेत्रीचा मृतदेह फ्लॉटमध्ये बंद होता. परवीनच्या फ्लॅटच्या दरवाजाबाहेर दुधाची पाकिटं आणि वर्तमानपत्रे अनेक दिवस पडून राहिल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. परवीनच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला.