मुस्लिमविरुद्ध फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न:व्होट जिहाद हा भाजपाचा दुष्प्रप्रचार, मराठी मुस्लीम सेवा संघांचा आरोप
2 hours ago
1
मराठी मुस्लीम सेवा संघाने महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा व्होट जिहाद असल्याचा आरोप मराठी मुस्लीम सेवा संघटनेने जोरकसपणे फेटाळून लावला आहे. विधानसभा निवडणुकीत आमच्या संघटनेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या, रवीशंकर प्रसाद व्होट जिहादचा आरोप केला आहे. हा आरोप म्हणजे दुष्प्रप्रचार आहे. कारण ज्यांचे विचार आम्हाला पटतील, त्या पक्षाला-उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे, असे मराठी मुस्लीम सेवा संघाने येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यावेळी मराठी मुस्लीम सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इब्राहिम खान, राज्य सहसचिव अब्दुल जब्बार शेख,पुणे शहराध्यक्ष जावेद शेख,सिकंदर मुलाणी, अस्लम बागवान आदी उपस्थित होते. इब्राहिम खान म्हणाले, मागील निवडणुकीत 'सब का साथ, सबका विकास' ऐकून आम्ही भाजपाला पाठिंबा दिला. तेव्हा तो व्होट जिहाद नव्हता का? या विषयावर जाहीर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. मुस्लिमांच्या आत्मसन्मानाशी खेळण्याचे काम भाजपने केले. सोमय्या यांनी मुख्तार अब्बास नक्वी, माधव भांडारी, डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांच्याकडून २०१४ च्या निवडणुकीत आम्ही दिलेल्या पाठिंब्याबाबत माहिती घ्यावी. भाजपाने बटेंगे, कटेंगे सारख्या घोषणा देऊन ध्रुवीकरणाचे प्रयत्न करू नये. मराठी मुस्लीम सेवा संघ आत्मसन्मान, संविधान अधिकार, रोजगार, प्रादेशिक अस्मिता या मुद्यावर काम करते. आमच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडीला मतदान करणार आहे. भाजपाला हरविण्यास जे सक्षम आहेत, त्यांना मतदान करणार आहे. सिकंदर मुलाणी म्हणाले, मुस्लीम हे राक्षस, देशद्रोही असल्याचे चित्र रंगविण्याचा प्रयत्न होत आहे. पण त्यांनी आम्ही शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणाऱ्या मुस्लीम सैनिकांचे वंशज आहोत, औरंगजेबची औलाद नाही, हे लक्षात ठेवावे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)