भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिले:त्यानंतरही मनोज जरांगे भाजपला दोष का देत आहेत? भाजप नेते विनोद तावडे यांचा सवाल
2 hours ago
1
भाजपने सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण त्यानंतरही मनोज जरांगे भाजपला दोष का देत आहेत हे समजत नाही, असा सवाल भाजप नेते विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे. विनोद तावडे यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, 'बटेगे तो कटेंगे 'हे वास्तव आहे. त्याला माझा पाठिंबा आहे. जम्मू काश्मीर मध्ये काश्मिरी पंडित विभागले गेले. स्थलांतरित झाले. जाती - जातीमध्ये लोक विभागले गेले की, त्याचा फायदा इतरांना होत असतो. या शब्दाचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतात. त्यामुळे काहीजण त्याला विरोध दर्शवतात. मराठा समाजाच्या प्रश्नांवर कोणी आंदोलन केले तर ते चांगलेच आहे. यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम आरक्षण दिले, नंतर त्याच्या बाबत विविध मागण्या वेळोवेळी समोर आल्या. मंडल आयोगाच्या माध्यमातून देखील आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. आम्ही सत्तेत असताना मराठा आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयात टिकवूनही दाखवले. पण त्यानंतरही मराठा नेते मनोज जरांगे भाजपला दोष का देत आहेत? हे समजत नाही. या पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, हेमंत लेले,प्रशांत कोतवाल ,पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. महायुतीला मतविभाजनाचा फायदा होईल विनोद तावडे पुढे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राज्यात प्रचार दौरा करत असताना सामान्य मतदारांची भावना समजून घेतली तर या निवडणुकीत महायुती स्पष्ट बहुमत पलीकडे जाईल असे आज चित्र आहे. लोकसभेला महायुतीच्या जागा कमी आल्या. त्यामुळे अनेकांच्या मनात विविध कल्पना निर्माण झाल्या. त्यांनी लोकसभा निवडणूक विश्लेषण नीट करणे गरजेचे होते. आघाडी पेक्षा केवळ ०.३ टक्के मते युतीला कमी होती. आता अनेक पक्ष निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे मत विभाजन होऊन युतीला चांगल्या जागा मिळतील. विनोद तावडे म्हणाले, मनसे मानसिक दृष्ट्या युती सोबत आहे. लोकसभा निवडणुकीत ४०० पार नारा मुळे मोदीच निवडून येणार असल्याने चार टक्के लोक मतदानास आले नाही ते यंदा येतील. महायुतीने राजकारण करताना प्रत्यक्ष लाभार्थी आणि अप्रत्यक्ष लाभ माध्यमातून विकास साधला आहे. विविध सरकारी योजना याद्वारे पायाभूत सुविधा निर्माण होऊन नागरिकांना फायदा झाला आहे. लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय झाली आहे. अशावेळी जेष्ठ नेते शरद पवार सांगत होते की, लाडकी बहिण योजना राबवताना इतर सर्व खात्याचे पैसे वळवण्यात आल्याचा आरोप केला आणि स्वतःच्या जाहीरनाम्यात योजना राबवणार असल्याचे सांगत दुटप्पी भूमिका घेत आहे. उध्दव ठाकरे हे राम मंदिर, हिंदुत्व कलम ३७० यास विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत जाऊन त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणे आणि आघाडी सोबत जाणे जनतेस पटले नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)