मोबाईल गेमच्या जुगारात पैसे हरल्याचा वादातून विद्यार्थ्याची हत्या; 'Miss You' स्टेट्स ठेवणारा मावसभाऊ निघाला खुनी

3 hours ago 1

Published on

18 Jan 2025, 9:42 am

Updated on

18 Jan 2025, 9:42 am

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: बीसीएसचा विद्यार्थी प्रदीप निपटे याची मोबाईल गेमच्या जुगारात जिंकलेले पैसे हरल्याच्या वादातून त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन मावस भावानेच निघृण हत्या केली. रूम पार्टनर येण्यापूर्वी चादरीने मृतदेह झाकून मृतदेहाशेजारी गेम खेळत बसला. संशय येऊ नये म्हणून पतंग खेळण्याच्या बहाण्याने निघून गेला. पुन्हा परत येऊन मृत झाल्याची खात्री केली. सोशल मीडियावर मिस यूचे स्टेटस ठेवले. अत्यंत शांत डोक्याने त्याने प्रदीपची हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शुक्रवारी (दि. १७) पत्रकार परिषदेत दिली. मारेकरी अल्पवयीन मावस भावाला सज्ञान समजावे, यासाठी जिल्हा न्यायालयाला पत्र देणार असल्याचेही ते म्हणाले. (Sambhajinagar Murder Case)

मावस भाऊ दोघेही ऑनलाईन गेमिंगच्या आहारी

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रदीप निपटे (१९, रा. पिंपरखेड, ता. वडवणी, जि. बीड) हा अमर शिंदे, अभिषेक लव्हाळे, महेश चव्हाण आणि अल्पवयीन मावस भाऊ यांच्यासोबत उस्मानपुरा भागातील म्हाडा कॉलनीत एका फ्लॅटमध्ये राहत होता. प्रदीप आणि त्याचा अल्पवयीन मावस भाऊ दोघेही ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेले होते. गेममध्ये जिंकलेल्या पैशातून दोघांमध्ये अनेकवेळा वादही झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून सोबतच राहत होते. दरम्यान, मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवारी (दि. १४) पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. अल्पवयीन मावस भावाने प्रदीपकडे त्याने ऑनलाईन गेमिंग जुगारात हरलेल्या पैशाची मागणी केली. त्यावरून दोघांमध्ये झटापट होऊन वाद झाला. अल्पवयीन मावस भावाने रूमवर कोणी नसल्याचे पाहून थेट चाकूने १७ हून अधिक वार करून प्रदीपची निघृण हत्या केली. मृतदेह चादरीने झाकला. रक्ताने माखलेले कपडे बदलले. त्याचा मोबाईल घेऊन पतंग उडवायला जातोय, असे सांगून निघून गेला. मात्र, काही वेळाने प्रदीपच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी रूमवर तो परत येऊन गेला. त्यानंतर बचावासाठी त्याने अत्यंत शांत डोक्याने प्लनिंग केल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास निरीक्षक अतुल येरमे करत आहेत. (Sambhajinagar Murder Case)

हत्येनंतर परफेक्ट प्लानिंग

  • रूमपार्टनर झेरॉक्स काढून येईपर्यंत प्रदीपची हत्या करून कपडे बदलले.

  • मृतदेह झाकून झोपला असल्याचे सांगितले. संशय येऊ नये म्हणून मृतदेहाशेजारी गेम खेळत बसला.

• प्रदीप मृत झाल्याची खात्री केल्यानंतरच त्याने रूम सोडली.

• साक्षीदार ठेवण्यासाठी वडापावच्या दुकानावर दुसऱ्या काही मित्रांसोबत गेला.

• प्रदीपचा मोबाईल सोबत नेऊन परिसरातील एका नालीत फेकला.

• चौकशीत पोलिसांच्या प्रश्नांना निर्भयपणे उत्तरे दिली.

एनडीए (आर्मी) तयारी करत असल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट.

• प्रदीपला प्रतिकार करण्याची संधी दिली नाही.

• हत्येनंतर तो परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद

• प्रदीपचे शवविच्छेदन सुरू असताना नातेवाइकांसोबत घाटीत उपस्थित

• सोशल मीडियावर प्रदीपसोबतच्या फोटोसह मिस यूचे ठेवले स्टेट्स. (Sambhajinagar Murder Case)

प्रदीप आणि त्याचा अल्पवयीन मावस भाऊ दोघेही प्रदीपच्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होते. मावस भाऊ गेम खेळण्यात पटाईत होता. गेममधून त्याने १ लाख रुपये जिंकले होते. प्रदीपही ऑनलाईन गेम खेळत होता. मात्र त्याने मावस भावाचे जिंकलेल्या १ लाख रुपयांमधील ६५ हजार रुपये हरला होता. त्यामुळे दोघांमध्ये त्या पैशावरून वाद सुरू होता. त्या दिवशीही याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास रागाच्या भरात चाकूने प्रदीपवर सपासप १७ वार करून त्याची हत्या केली. या झटापटीत त्या अल्पवयीन मावस भावालाही जखम झाल्याची माहिती उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली. (Sambhajinagar Murder Case)

पोलिसांना दोन दिवस फिरवले

प्रदीपची हत्या झाल्यानंतर मारेकरी जवळचाच असावा, असा पोलिसांना अंदाज होता. सर्व रूम पार्टनर, अल्पवयीन मावस भाऊ यासह वर्गमित्र सर्वांची कसून चौकशी केली. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी पुन्हा पुन्हा फिरवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article