यंदा तीस वर्षांतील विक्रमी मतदान झालेPudhari File Photo
Published on
:
24 Nov 2024, 12:38 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:38 am
मुंबई ः राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी यंदा 65.11 टक्के मतदान झाले आणि गेल्या तीस वर्षांतील हा विक्रम असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या वाढीव मतदानाचा लाभ महायुतीच्या पारड्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या वेळच्या तुलनेत मतदान 4 टक्क्यांनी अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यातही कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 76.25 टक्के, तर त्या खालोखाल गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 73.68 टक्के मतदान झाले. 2019 साली राज्यात 61.14 टक्के मतदान झाले होते. मुंबईने राज्यात सर्वात कमी मतदानाची परंपरा कायम राखली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी 52.07 टक्के, तर मुंबई उपनगरात 55.77 टक्के मतदान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातही 56.05 टक्के इतके कमी मतदान झाले. राज्यात 2009 मध्ये 60 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये मतांचा टक्का किंचित वाढून तो 63.68 टक्के झाला होता. यावेळी वाढीव मतदानाचा फायदा महायुतीला मिळाला. त्यात प्रामुख्याने लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. महिलांनी भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला भरभरून केल्याचे दिसून आले आहे.