लाडकी बहीण, बटेंगे तो कटेंगे घोषणेने वाढला मतदान टक्का:90 मतदारसंघांत मतांचा संमिश्र कौल, या 5 मुद्द्यांनी फिरवली निवडणूक
9 hours ago
1
राज्यात विधानसभेसाठी काल मतदान पार पडले. यात लाडकी बहीण,संघाची मोहीम, सोयाबीन हमीभाव, जरांगे पॅटर्नयासह बटेंगे तो कटेंगे या 5 मुद्द्यांनी निवडणूक फिरवली. पाहूयात महिला मतदारांनी केले मोठ्या प्रमाणावर मतदान
लाडकी बहीण
लाडकी बहीण योजनेत २.३० कोटी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळाले. तसेच युती व आघाडीने आपले सरकार अाले तर ही रक्कम अनुक्रमे २१०० व ३ हजार रुपये करण्याचे अाश्वासन दिले. त्यामुळे महिलांनी सर्वच जिल्ह्यांमध्ये भरभरून मतदान केले. मतदान वाढीच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश
संघाची माेहीम
लोकसभा निवडणुकीत मतदान कमी झाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मतदान वाढीसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याला चांगले यश आल्याचे दिसून येते. २०१९ च्या विधानसभेत ६१.०१ % तर २०२४ च्या लोकसभेत ६१.५% मतदान झाले होते.
सोयाबीन हमीभाव
सोयाबीनला योग्य हमीभाव मिळत नसल्याने मराठवाडा, विदर्भासह राज्यातील ९० मतदारसंघांत सरकारविरोधात रोष होता. पण मतदानात हा रोष शंभर टक्के मतदानात उतरलेला दिसत नाही. कारण शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनामुळे काही ठिकाणी युतीला तर काही ठिकाणी आघाडीला कौल. लोकसभेचाच पॅटर्न विधानसभेत
जरांगे पॅटर्न
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, असा संदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यानुसार मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान केले. लोकसभेत हाच पॅटर्न चालल्यामुळे महाविकास आघाडीला फायदा होऊन युतीचे नुकसान झाले होते. मराठवाड्यात यंदा हेच चित्र होते. मतांच्या ध्रुवीकरणामुळे लढत अधिक चुरशीची
बटेंगे तो कटेंगे
भाजपच्या नेत्यांनी बटेंगे तो कटेंगे नारा देऊन ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अल्पसंख्याक मतेही आणखी संघटित झाली. त्यामुळे अनेक मतदारसंघांत चुरशीची लढत झाली. आता या ध्रुवीकरणाचा फायदा कुणाला होतोय हे निकालानंतरच कळेल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)