‘लाडकी बहीण’सह महायुती सरकारने घेतलेले निर्णय गेमचेंजर ठरतील

6 days ago 2
पुढारी वृत्तसेवा

Published on

19 Nov 2024, 3:45 am

Updated on

19 Nov 2024, 3:45 am

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ कागल विधानसभा मतदारसंघातून गेली पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व करत आहेत. आतापर्यंत त्यांनी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली आहे. प्रथमच ते महायुतीतर्फे निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची घेतलेली मुलाखत.

महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघातील संपूर्ण जनता आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे किमान एक लाखाच्या मताने आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

प्रश्न : सातव्यांदा आपण निवडणूक रिंगणात उतरत आहात. याबद्दल काय सांगाल?

उत्तर : विधानसभेची आपण आतापर्यंत सातवेळा निवडणूक लढविली. परंतु टर्म आपली सहावी आहे. गेल्या पंचवीस वर्षांतील आपले काम आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत आणि झोपडीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय योजनांपासून कोणी वंचित राहू नये, यासाठी आपले सतत प्रयत्न सुरू असतात.

प्रश्न : बदललेल्या भूमिकेला जनतेचा प्रतिसाद कसा आहे?

- शरद पवार यांच्यासोबत 35 वर्षे काम केल्यानंतर आपणास भूमिका बदलावी लागली. ही भूमिका का बदलावी लागली हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आपण बदललेली भूमिका जनतेने समजून घेतली आहे. आपल्या कामाची पद्धत सर्वांना माहिती आहे. सकाळी सहा वाजल्यापासून आपण जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतो. काम घेऊन येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याची आपली भूमिका असते. त्यात आपण दुजाभाव करत नाही. जो दारात येईल, त्याचे काम आपण करत असतो. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद चांगला अहे. विशेषत: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे माता, भगिनींचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. सभेला कधीही महिला बाहेर येत नव्हत्या, आता हजारोंच्या संख्येने महिला सभेला येत आहेत. ही योजना या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार आहे. यामुळे आपण किमान एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होऊ.

प्रश्न : संजय मंडलिक व संजय घाटगे गट आपल्या सोबत आहेत काय?

- संजय घाटगे व आपल्यात सहा वेळा लढत झाली आहे. असे असताना दोन-अडीच महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे. घाटगे हे प्रगल्भ राजकीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनाचा मला खूप मोठा फायदा होणार आहे. संजय मंडलिक व त्यांचे चिरंजीव वीरेंद्र दोघेही महायुतीचे घटक असल्यामुळे ते प्रामाणिकपणे आपल्या पाठीशी आहेत. दोन्ही गटाचे सर्व कार्यकर्ते माझ्या विजयासाठी जीवाचे रान करत आहेत.

प्रश्न : विरोधकांकडून होणार्‍या आरोपाबाबत काय

उत्तर : शरद पवार हे आपले दैवत आहेत. यापुढेही राहतील. विरोधी उमेदवारांची परिस्थिती आपल्यापेक्षा वाईट आहे. फूल ना फुलाची पाकळी म्हणून पवार यांना गुरुदक्षिणा दिली आहे. परंतु ज्यांना भारतीय जनता पक्षाकडून दहा वर्षे सन्मान मिळाला, पदे मिळाली आणि देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठ्या प्रमाणात त्यांना निधी दिला. ते सांगतील त्याप्रमाणे सत्ता राबविली. बढत्या, बदल्या याद्वारे त्यांनी प्रचंड माया गोळा केली. परंतु वेळ आल्यावर त्यांनी भाजपशी प्रतारणाच केल्याचे दिसते. गेल्यावेळी महायुतीचे उमेदवार संजय घाटगे यांचा प्रचार न करता त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि बंड केले. यावेळीही भाजपचा फायदा घेतला आणि शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसले. मांडीवर बसण्यापूर्वी त्यांनी अनेकवेळा पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे गद्दार कोण हे दिसते. त्यामुळे आता गद्दार म्हणायचे असेल तर मी छोटा गद्दार आणि विरोधक महागद्दार असल्यामुळे लोक महागद्दाराला विधानसभेच्या निवडणुकीत धडा शिकवतील.

प्रश्न : भविष्यात कोणत्या योजना राबविणार?

उत्तर : गेल्या पाच वर्षांत मतदारसंघासाठी 7 हजार कोटींचा निधी आणला. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात प्रचंड विकासाची कामे केली आहेत. कोल्हापुरात आय.टी. पार्क व्हावे अशी आपली मनापासून इच्छा आहे. आय.टी. पार्क सुरू झाल्यास शहराच्या विकासाला चालना मिळते. त्यामुळे यापुढे कोल्हापुरात आय.टी. पार्कसाठी आपण प्रयत्न करणार आहे. याशिवाय उत्तूरमध्ये औद्योगिक वसाहत स्थापन करणे आणि गडहिंग्लज औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. याशिवाय जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणामध्ये अधिक उठावदार काम करण्यावर आपला भर राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article