लेख – ‘बायोहॅकिंग’चा नवा प्रवाह

2 hours ago 1

>> महेश कोळी

लाइफ इज मिंट फॉर जॉयम्हणजे जीवन हे जगण्यासाठी आहे. मात्र काही जण नैसर्गिक आणि शारीरिक स्थितीत आपल्या इच्छेनुसार बदल करत अधिकाधिक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. यासाठीबायोहॅकिंगहा असा एक शब्द तयार झाला असून तो शारीरिक क्षमता आणि आयुर्मान वाढविण्याशी जोडला गेला आहे. आज जगभरातील लोक याकडे आकर्षित होत आहेत. भारतातदेखीलबायोहॅकिंगचे फॅड वाढत आहे. त्याच वेळी लोकांकडूनही विचारणा केली जात आहे. काय आहे हा प्रकार? तो सुरक्षित आहे का?

बायो आणि हॅकिंग हे दोन शब्द आरोग्याशी संबंधित बायोलॉजिकल प्रक्रिया सांगणारे आहेत. ही प्रक्रिया अपारंपरिक असली आणि त्यावर वैद्यकीयदृष्टय़ा शिक्कामोर्तब झालेले नसेल तरीही यामागे काही शास्त्रीय तथ्ये आहेत. अलीकडील काळात बायोहॅकिंगचा व्यक्तिगत वापर वाढत असल्याचे निदर्शनास येत असून ते धोकादायक आहे. मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या या नव्या ट्रेंडचा भारतात वेगाने प्रसार होत असल्याचे वृत्त हे एक प्रकारे समाजाला उत्तेजित करणारे आहे. ‘बायोहॅकिंग’ची क्रेझ एवढी वाढली की त्याचा प्रयोग करणाऱ्यांची संख्या काही पटींनी वाढत आहे. आता डायटिंगबरोबर नैसर्गिक उपचार पद्धत आणि योग ध्यानधारणेशी संबंधित असलेल्या तथ्यांनादेखील या संकल्पनेशी जोडले जात आहे.

47 वर्षीय अमेरिकी बायोहॅकर आणि उद्योजक ब्रायन जॉन्सन हा मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी आतूर झाला आहे. अलिकडेच त्याने भारताचा दौरा केला आणि या ठिकाणी त्याने ‘एज रिव्हर्सिंग ब्लूप्रिंट प्रोटोकॉल’ लाँच केला. यात त्याने अनेक सप्लिमेंट्स, टेस्ट, एस्पेरिमेंट्स प्रामुख्याने आहार तालिका (डायट प्लॅन) आणि एलईडी लाईट एस्पोजर यांसारख्या अनेक उपायांच्या आधारे आयुर्मान वाढविण्याचे दावे केले. एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार भारतात असा एक समूह सक्रिय आहे की, तो शरीर आणि मेंदू चांगला होण्यासाठी नानाविध उपाय करत आहे. यात कडाक्याच्या थंडीत बर्फाचे स्नान करणे इथपासून ते रेड लाईट थेरेपी आणि असंख्य सप्लिमेंट्सचा वापर यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर काही लोकांच्या दिनचर्येत हायपरबेरिक ऑसिजन थेरेपीचादेखील समावेश आहे. काही जण इलेट्रोमॅग्नेटिक लहरी तयार करणाऱ्या उपकरणातून आयुष्य वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व गोष्टी आणि घडामोडी पाहता बायोहॅकिंग म्हणजे काय, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरत आहे.

भारतात वाढत्या बायोहॅकर कम्युनिटीकडे जॉन्सनसारखे भलेमोठे बजेट नसेल, परंतु ते आरोग्य चांगले करण्यासाठी आपापल्या परीने मार्ग अवलंब करत आहेत. पण याला आधुनिक उपचार पद्धतीने मान्यता दिलेली नाही. तसेच त्यासंदर्भात अनेक शोध अहवालदेखील आलेले नाहीत. असे असले तरी काही बायोहॅस सोपे आहेत. म्हणजे ध्यान, उपवास, सप्लिमेंट्स घेणे, सूर्यस्नान, व्यायाम आदी. मात्र या क्षेत्रात अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. उदाहरणच घ्यायचे तर जॉन्सनने आपल्या मुलांसमवेत प्लाझ्मा आणि ब्लड स्वॅप केला होता. त्याच वेळी चेहऱ्यात डोनर फॅट इंजेक्शनही टोचून घेतले. पण ते यशस्वी ठरले नाही. भारतात बायोहॅकिंगचे प्रस्थ कशा रीतीने विकसित झाले आणि त्याचा कसा प्रसार झाला, हा खरा प्रश्न आहे. कारण बायोहॅकिंग हे आधुनिक औषधांचे नकारात्मक परिणाम म्हणजे साईडइफेक्ट्समधून समोर आले आहे. दीर्घायुष्य किंवा आरोग्यदायी जीवन जगण्याची लोकांत आसक्ती वाढत असून यामुळे लोक बायोहॅकिंगकडे वळत आहेत.

भारतात ‘डिकोड एज’चे सहसंस्थापक राकेश सोमाणी यांनी दहा वर्षांपूर्वी आपल्या कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठी बायोहॅकिंग सुरू केली. आता यामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत अणि आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

बायोहॅकिंगचे अनुकरण करणारे काही जण दिल्लीतील प्रचंड कडाक्याच्या थंडीत बर्फाच्या पाण्यात डुबकी मारतात. त्यांच्या मते, आईस बाथ म्हणजेच बर्फ स्नान हे इम्यून सिस्टीम अधिक बळकट करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढविते आणि व्यायामाने रिकव्हरीदेखील चांगली होते. मेंदू अधिक तल्लख होतो. काही जणांनी ग्लुटेन, कॉर्न, डेअरी आणि प्रोसेस्ड फूड खाणे बंद केले. त्यांचा डिनर सायंकाळी सहा-सात वाजताच संपतो. अशी मंडळी त्वचेचे आरोग्य, स्नायू बळकट करणे यासाठी रेड लाईट थेरेपीचा वापर करतात. योगाबरोबरच ताणतणाव नियंत्रित करण्यासाठी न्यूरोफीडबॅकचे वेळापत्रक पूर्ण करतात. काही जण आठवडय़ात दोनदा 23 तासांचा उपवास करतात. या प्रक्रियेत प्रोटीन घेणे, असंख्य सप्लिमेंट्स, क्रायोथेरेपी (जबरदस्त थंडीत राहणे), अँटी एजिंग आयव्ही ड्रिप्स आणि रेड लाईट थरेपी याचा समावेश आहे. अशा प्रकारे प्रयोग करणाऱ्या लोकांसाठी या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. विशेष म्हणजे ही मंडळी दररोज केवळ सहा तासच झोपू शकतात आणि आपला प्रोग्रेस जाणून घेण्यासाठी उपकरणदेखील बाळगतात. काही जण उन्हात बसतात, गवतात अनवाणी चालतात, ग्राउंडिंग मॅट्सचा वापर करतात. त्याच वेळी दीर्घायुष्य लाभावे यासाठी ब्लू लाईट ब्लॉकिंग ग्लास घालतात.

सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, लोक आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी आणि ते वाढविण्यासाठी युद्धपातळीवर आणि येनकेन प्रकाराने प्रयत्न करत आहेत. अर्थात या प्रकारच्या वाढत्या हालचालींमुळे काही जणांच्या डोक्यात प्रश्न जन्माला घालत आहेत. बायोहॅकिंग नुकसानकारक सिद्ध होऊ शकते का? याबाबत स्पष्टीकरण देताना सीएसआयआर इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमेस अँड इटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे तज्ञ म्हणतात, बायोहॅकिंग हा एक धोक्याचा मार्ग ठरू शकतो. कारण बहुतांश बायोहॅकिंग प्रक्रिया ही संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करत केली जाते. उदाहरणार्थ वजन कमी करण्यासाठी मधुमेहाचे औषध ओझेम्पिक घेण्याचे प्रस्थ वाढले आहे. हे औषध लठ्ठपणा आणि मेडिकल कॉम्प्लेशन असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र जेव्हा एखादा सेलिब्रिटी थोडे वजन कमी करण्यासाठी या गोळ्या घेतो तेव्हा ते हॅकिंग असते. याचा दीर्घकालीन प्रभाव आणि परिणामांची माहिती नसल्याने या हॅकिंगचे समर्थन करता येत नाही. एक उदाहरण देताना ते सांगतात की, भूक कमी करणाऱ्या गोळ्यांचे प्रस्थ अलीकडील काळात वाढले आहे; पण या गोळ्यांच्या सेवनामुळे पल्मोनरी हायपरटेन्शनचा धोका वाढू शकतो आणि काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. हे लक्षात आल्यानंतर त्याच्या सेवनावर आपोआपच बंधन येते. यामधील बॉटमलाईन किंवा तळाशी असणारे शाश्वत सत्य काय आहे, तर आपले शरीर कायम जगण्यासाठी तयार झालेले नाही. अशा वेळी बायोहॅकिंगसारखे उराशी बाळगलेले वेड हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक राहू शकते. म्हणून आपले आयुष्य सुधारण्यासाठी सध्याच्या संशोधनाचे आकलन करावे आणि त्यानुसार स्वतः सवयी लावून घ्याव्यात अन्यथा ते भोंदूबाबांच्या उपचारासारखे ठरू शकतात. शेवटी काळजीपूर्वक सर्व गोष्टींचा विचार करावा आणि निर्णय घ्यावेत.

(लेखक संगणक अभियंता आहेत.)

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article