वंचित कुणासोबत सत्तेत जाणार?:प्रकाश आंबेडकर म्हणाले - कोणत्या विचारधारेला बहुमत मिळते यावर ठरणार, उमेदवाराला पळवल्याचा केला आरोप
3 days ago
2
आम्ही सत्तेत सहभागी होणार आहोत. पण कोणत्या विचारधारेला सर्वाधिक मते मिळतात, त्यावर ते अवलंबून आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. वंचितचे कार्यकर्ते आणि उमेदवारांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला. तसेच आयाराम-गयाराम आणि खरेदी पोरोष होण्यापेक्षा एका विचाराचे सरकार चालेल, यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकरांनी केले. वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे कृषी नगरातील पोदार शाळेतील मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? यंदाच्या निवडणुकीनंतर दोन राष्ट्रीय पक्ष बाजूला झालेले असतील, एवढे दिसून येत आहे. प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य वाढलेले असेल, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. आम्ही जेवढ्या लढलो तेवढ्या निवडून याव्यात अशी आमची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. तिसरी आघाडी निर्णयक असणार का? या प्रश्नाला उत्तर देताना, त्याबाबत 23 तारखेला समजेलच असे आंबेडकर म्हणाले. देशात पुन्हा 1990 सारखी परिस्थिती
आम्ही सत्तेत जाणार आहोत. पण कोणत्या विचारधारेला जास्त मते मिळतात त्यावर आमचा सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय होणार आहे. देशात पुन्हा 1990 सारखी परिस्थितीची सुरुवात होत आहे. हा चांगला संकेत आहे. यामुळे देशातील राष्ट्रीय पक्षांचा जो मनमानी कारभार चालला आहे, त्यावर अंकुश लागेल, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. चार दिवसांपूर्वी उमेदवार पळवला, अद्याप सापडला नाही
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचे कार्यकर्ते आणि उमेदवारांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाल्याचा आरोप केला आहे. कळमनुरी आणि देवळाली मतदारसंघातील उमेदवारांवर हल्ला झाला आहे. तर वरुड मोर्शी येथील 84 वर्षांच्या उमेदवाराला चार दिवसांपूर्वी पळवून घेऊन गेले आहेत. आम्ही पोलिसांत तक्रार देऊन तीन दिवस झाले आहेत. तो उमेदवार अद्यापही सापडत नाहीये. लोहा-कंधारमध्येही असाच प्रकार घडला आहे. लक्ष्मण हाके यांच्यावरही हल्ला झाला आहे. नवनाथ वाघमारे यांच्यावरही हल्ला झाला. यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यात सत्ता परिवर्तन होत असल्याच्या भितीतून हा सर्व प्रकार होत असावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मतदान करण्याचे आवाहन आपण ज्या विचारसरणीला मानता, त्या विचारसरणीला मोठ्या प्रमाणात मतदान करावे. आयाराम-गयाराम आणि खरेदी पोरोष करण्यापेक्षा एका विचाराचे सरकार चालेल, यासाठी मतदान करावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना केले आहे. हे ही वाचवा... शिंदे गटाच्या MLA ची समीर भुजबळांना ठार मारण्याची धमकी:म्हणाले - आज तुझा मर्डर फिक्स; नांदगाव - मनमाड मतदारसंघात राडा आमदार सुहास कांदेंनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात सुहास कांदे समर्थक अन् पोलिसांसमोर समीर भुजबळांना हातवारे करत तुझा मर्डर फिक्स म्हणत धमकी देत असल्याचे दिसत आहे. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)