वकील गुणरत्न सदावर्तेंच्या संचालकांचा 150 कोटींचा घोटाळा:पत्नीच्या खात्यावर 43 लाख रुपये जमा, एसटी कामगार संघटनेचा गंभीर आरोप
7 hours ago
1
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालकांनी एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेने केला आहे. तसेच नोकरभरती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लखणची रोख रक्कम संचालकांनी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या खात्यावर आरटीजीएस केल्याचा पुरावा देखील एसटी कामगार संघटनेने सादर केला आहे. बँक संचालक सुरेंद्र उके यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया उके यांच्या नावे पैसे घेतल्याचा आरोपही एसटी कामगार संघटनेकडून करण्यात आला आहे. तसेच सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या खात्यावर संचालक मगरे, सितापराव, उके आणि घकाते यांनी 43 लाख रोख रक्कम जमा केल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर एसटी बँक भर्ती घोटाळ्यातले पैसे परत मागितल्याने एका संचालकाने धमकावल्याचा व्हिडिओ देखील तक्रारदार शिवनाथ डोंगरे यांनी यावेळी माध्यमांसमोर सादर केला आहे. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच चर्चेत असतात. बीड प्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुणारत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देत आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली होती. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते बीड प्रकरणात स्टेअरिंग हातात घेतल्यासारखे वर्तन करत आहेत. जसे पोलिस हवालदार काम करतात आणि माहिती शोधून आणत असतात तसेच सुरेश धस एकेक माहिती शोधून काढत आहेत, असे म्हणत त्यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. पुढे गुणरत्न सदावर्ते म्हणाले, सुरेश धस यांचे एका विशिष्ट जात समूहासंबंधित जे काही चललेले आहे, त्यांचे बोलणे, चालणे यामुळे वंजारी समाज विक्टीम होत आहे. ही जर वस्तुस्थिती असेल अत्र तपासातील अधिकाऱ्यांनी स्वतःहून यापासून वेगळे राहयाला काही हरकत नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)