वक्फच्या नावाखाली मांडकीतील मराठा समाजाची जमीन हडप करण्याचा प्रयत्न:शेतकऱ्यांचा पत्रकार परिषदेतून अधिकारी, इम्तियाज जलीलांवर आरोप
1 day ago
1
मांडकी येथील ६६ एकर मराठा समाजाच्या जमिनीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे. खंडपीठाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही वक्फ बोर्डाचे अधिकारी आणि माजी खा. इम्तियाज जलील यांचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना जमीन सोडून जाण्यासाठी धमक्या देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मांडकीच्या १५ शेतकऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत असा आरोप केला. पुढच्या तीन महिन्यांत येथे इज्तेमा होत आहे. त्यासाठी ६६ एकर जागा रिकामी करण्यासाठी धमकावले जात आहे. पोलिस प्रशासनाकडे दहापेक्षा जास्त तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी सांगितले की, संबंधित जागेवर मांडकी येथील मराठा समाजाच्या डक, गायकवाड, चौथे आदींचा ताबा आहे. सत्तर वर्षे वयाच्या अरुणा डक यांनी सांगितले की, जागा रिकामी करण्याच्या धमक्या देतात. महिला काम करीत असताना त्यांच्यासमोर लघुशंका केली जाते. शेतातील मका चोरून नेल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपने उभे केलेले कुभांड मांडकी येथील जागेशी माझा कुठलाच संबंध नाही. निवडणूक असल्यामुळे मला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे कुभांड रचले जात आहे. भारतीय जनता पार्टी आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार अतुल सावे यांचे बोलविता धनी आहेत. आपण कधीच कुठल्याही जमीन मालकाला धमकावलेले नाही. माझ्यावर लावलेले आरोप धादांत खोटे आहेत. -इम्तियाज जलील, माजी खासदार तथा एआयएमआयएम नेते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)