वजन कमी करणे सोपे नाही यासाठी डायट आणि वर्कआउट दोन्ही फॉलो करणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यात कॅलरी कमी आणि जीवनसत्वे तसेच खनिजे मोठ्या प्रमाणात असतील. दिवसाच्या सुरुवातीला खाल्लेला नाश्ता शरीराला ऊर्जा तर देतोच पण वजन कमी करण्यासही महत्त्वाची भूमिका बजावतो. पोषणतज्ञ नमामि अग्रवाल सांगतात की नाश्त्यांमध्ये फास्टफूड किंवा पॅक्ड फूड खाल्ल्यास त्याचा चयापचय क्रियेवरही परिणाम होतो. यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावते. तज्ञांनी सांगितले आहे की तुम्ही तुमच्या नाश्त्यातून काही गोष्टी काढून टाका ज्यामुळे तुमचे वजन सहज कमी होवू शकेल.
पांढरे ब्रेड
पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. पांढ-या ब्रेडमध्ये अधिक शुद्ध कर्बोधके असतात त्यामुळे वजन लवकर वाढते. त्या ऐवजी अधिक फायबर असलेले ब्रेड खा.
डबाबंद ज्यूस
बाहेरच्या डबा बंद केलेल्या ज्यूस मध्ये फायबर कमी आणि साखर जास्त असते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. शक्यतो हा ज्यूस पिणे टाळा. ज्यूस प्यायचा असेल तर घरच्या घरी ताज्या फळांचा ज्यूस तयार करून तुम्ही पिऊ शकता.
बेकरीचे पदार्थ
नाश्त्यामध्ये अनेक जण केक, डोनट यासारख्या बेकरी मध्ये तयार झालेल्या पदार्थांचा समावेश करतात. या पदार्थांमध्ये रिफाइंड आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने आजारांचा धोकाही वाढतो.
चहा आणि कॉफी
साखर युक्त चहा किंवा कॉफीमुळे वजन वाढते. यामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. चहा, कॉफी पिण्याऐवजी तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी किंवा हर्बल टी चे सेवन करू शकता. कॅमोमाइल, पेपरमिंट किंवा ग्रीन टी पिऊ शकता.
साखरयुक्त बिस्किटे
काही लोक नाश्त्यांमध्ये साखरयुक्त बिस्किटे खातात. यामध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. हे बिस्किटे नाश्त्यात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे पातळी झपाट्याने वाढते. बाजारामध्ये मिळणारी बिस्किटे विकत घेण्याऐवजी तुम्ही बदाम, अक्रोड आणि काजू असलेली बिस्किटे घरीच तयार करू शकता.