वाळूजच्या बांधकाम व्यावसायिकाचा मध्य प्रदेशमधील जंगलात जाळून खून:खरगोन जिल्ह्यातील जंगलात सापडला मृतदेह

2 hours ago 1
वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील कमळापूर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मध्य प्रदेशातील जंगलामध्ये पेट्रोल टाकून जाळून खून करण्यात आला. हा प्रकार बुधवारी (९ ऑक्टोबर) गोडवा (ता. सनावत, जि. खरगोन) गावातील जंगल परिसरात उघडकीस आला. किशोर बाबुराव लोहकरे (४०, रा. कमळापूर) असे खून झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी लोहकरे यांच्या गाडीचा चालक जावेद सत्तार शेख (४०, रा. कमळापूर) याला अटक केली आहे. दरम्यान, जावेदला अटक केल्याची माहिती समजल्यानंतर लोहकरे यांच्या नातेवाइकांनी त्याच्या घरावर दगडफेक केली. लोहकरे हे पत्नी, दोन मुलांसह कमळापूर येथे वास्तव्यास होते. ते मुंबई येथे जात असल्याचे पत्नीला सांगून १७ सप्टेंबर रोजी घरातून १० लाख रुपये घेऊन सकाळी चालक जावेद सत्तार शेख (रा. कमळापूर) याला सोबत घेऊन गेले होते. मोबाइल लोकेशनवरून शोध बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी किशोर यांच्या मोबाइलचे लोकेशन तपासण्यास सुरुवात केली. त्यांचे लोकेशन खंडवा येथे दाखवण्यात आले. त्यानंतर किशोर यांचे बंधू व पोलिस जावेदला घेऊन मध्य प्रदेशात गेले. कपड्यांवरून पटली ओळख दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर पोलिस व नातेवाईक लोहकरे यांचा शोध घेत होते. सनावत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोडवा या गावाच्या हद्दीतील जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. हातातील दोरा व कपड्यांवरून त्यांची ओळख पटली. पत्नीची पोलिसांत तक्रार २७ सप्टेंबर रोजी जावेद कार घेऊन घरी परतला. २८ सप्टेंबर रोजी पत्नी आशा यांनी पती किशोर यांना मोबाइलवर फोन केले. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. त्यामुळे त्यांनी पतीचा शोध घेतला. ते सापडले नाहीत म्हणून ३ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी वाळूज ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. गाडीचालकाच्या घरावरच्या दरवाजे, खिडक्या नातेवाइकांनी जेसीबीने तोडल्या. चालकाला परत बोलावून घेतले १९ सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास चालक जावेद शेख परतला. त्याने किशोर यांनी सोबत नेलेले १० लाख रुपये त्यांच्या पत्नीकडे दिले. किशोर हे मुंबईला थांबले आहेत, असे सांगून कार घरासमोर लावून तो निघून गेला. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी किशोर यांनी पत्नीला फोन केला. ‘जावेदजवळ १० लाख रुपये दे व कार घेऊन इंदूरला पाठव, मी इंदूरला जात आहे,’ असे पत्नीला सांगितले. त्यानंतर पत्नीने जावेदला १० लाख रुपये दिले. तो कार घेऊन इंदूरकडे रवाना झाला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article