विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन:आता प्रत्येक मतदारांच्या मत परिवर्तनासाठी उमेदवारांकडून प्रयत्न
3 days ago
1
विधानसभा निवडणूकीतील जाहीर प्रचार सोमवारी १८ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता थांबला. तरीही प्रत्येक उमेदवारांच्या दृष्टीने मतदानापूर्वी उरलेले २४ तास निर्णायक आहे. या काळात कशाप्रकारे मतांचे ‘जुगाड’ करुन विजयश्री खेचता येईल. यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अनेक उमेदवारांनी आपली शक्ती पणाला लावून सभा, रॅली, प्रचारदौऱ्यांतून शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान आठही मतदार संघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात या उमेदवारांनी वेधले लक्ष ः अमरावती मतदार संघात रविवारी १७ नोव्हेंबरला सायंकाळी महायुतीच्या उमेदवार आमदार सुलभा खोडके यांनी अंबागेट परिसरात महापदयात्रा काढली होती. बडनेरा मतदार संघात अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांच्या प्रचारासाठी आमदार बच्चू कडू यांनी सभा गाजवली. सोमवारी १८ नोव्हेंबरला दुपारी तिवसा मतदार संघातील अनेक गावात आमदार यशोमती ठाकूर यांनी काढलेल्या पदयात्रेला नागरिकांनी भरगच्च प्रतिसाद दिला. उर्वरित. पान ४ अचलपूर मतदार संघात प्रहार जनशक्ती पार्टीचे आ. बच्चू कडू, भाजपचे (महायुती) प्रवीण तायडे, काँग्रेसचे (मविआ) बबलू देशमुख यांच्यात थेट लढत रंगणार असल्याचे चित्र या मतदार संघातील राजकीय वातावरणावरून दिसून येत आहे. या नेत्यांच्या झाल्या प्रचार सभा ५ नोव्हेंबरपासून जाहीर प्रचाराला सुरूवात झाली होती. ५ ते १७ नोव्हेंबर या काळात जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित, आझाद समाज पार्टीतील मोठ्या नेत्यांनी सभा, रोड शो घेतले आहेत. महायुतीकडून केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दोन, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे, अमोल मिटकरी यांच्या सभा झाल्या. याच काळात ‘मविआ’कडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सुषमा अंधारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इम्रान प्रतापगढी यांनीही सभा गाजवल्या. याचवेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ‘वंचित’चे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याही शब्दरुपी तोफा या काळात जिल्ह्यात धडाडल्या. याचवेळी खासदार चंद्रशेखर आझाद यांनी रोड शो केला होता. अमरावतीत चौरंगी लढत अमरावतीत प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत रंगत कायम आहे. महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके, मविआचे सुनिल देशमुख, अपक्ष जगदीश गुप्ता आणि आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल यांच्यात जोरदार लढत होणार असल्याची चर्चा सद्या आहे. त्यामुळे मतविभाजन या ठिकाणी कोणासाठी फायदाचे व कोणाचे नुकसान करणार, हे निकालानंतर समोर येईल. तिवस्यात लक्षवेधी लढत राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री, काँग्रेसच्या नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उमेदवारीमुळे तिवसा मतदारसंघाने राज्याचे लक्ष वेधले. याठिकाणी भाजपचे राजेश वानखडे हे गेल्यावेळचेच प्रतिस्पर्धी त्यांच्या विरोधात उभे आहेत. दोघांच्याही प्रचाराला त्या-त्या पक्षाचे मोठे नेते येऊन गेले. दरम्यान शेवटी कोण बाजी मारतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)