भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटण्याचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीने हा आरोप केला आहे. मतदानाच्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या सर्व प्रकारानंतर विनोद तावडे यांना वसई-विरारमध्ये 23 तारखेपर्यंत बंदी घालण्यात आल्याची माहिती आहे. तसेच विनोद तावडे यांची पत्रकार परिषद देखील रद्द करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या बुधवारी एका टप्प्यात मतदान होणार आहे. त्याआधीच आज बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी तावडे यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर वसई-विरार पोलिसांनी विनोद तावडेंवर बंदी घातली आहे. विनोद तावडे यांना 23 तारखेपर्यंत म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत वसई-विरारमध्ये येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. यासंदर्भात वसई-विरार पोलिसांनी माहिती दिली आहे. नेमका काय आहे 'बविआ'चा आरोप?
बहुजन विकास आघाडीच्या आरोपानुसार, भाजप सरचिटणीस विनोद तावडे मंगळवारी विरार पूर्वच्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यासोबत भाजप उमेदवार राजन नाईक व भाजपचे काही पदाधिकारी होते. तिथे त्यांची बैठक सुरू होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. त्यांनी त्यांच्यावर पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप केला. त्यानंतर तिथे प्रचंड राडा झाला. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूरही आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाली. काय म्हणाले हितेंद्र ठाकूर? विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना दोन डायऱ्या सापडल्या. विनोद तावडे यांनी तिथे आपली बैठक सुरू होती असा दावा हितेंद्र ठाकुर यांनी केला आहे. पण मतदानापूर्वी 489 तास अगोदर बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का? एवढी अक्कल तावडे यांना नाही का? आता पोलिस या प्रकरणात कोणती कारवाई करतात हे पहावे लागेल. कारण, सरकार त्यांचेच आहे, असेही हितेंद्र ठाकूर म्हणाले. हे ही वाचा... विनोद तावडेंनी फेटाळले पैसे वाटल्याचे आरोप:म्हणाले - मी 40 वर्षांपासून राजकारणात, कुणी काहीही आरोप केले तरी मला फरक पडत नाही आघाडीचे नेते व उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. तसेच यावेळी हॉटेलमध्ये भाजपचे उमेदवार राजन नाईक हे देखील उपस्थित होते. क्षितिज नाईक यांनी जेव्हा हॉटेलचा तपास केला तेव्हा अनेक खोल्यांमधून लाखांच्या घरात पैसे सापडत होते. यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्या सांगण्यानुसार विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विनोद तावडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. सविस्तर वाचा... भाजपच्या नोट जिहादने तावडेंचा 'विनोद':पुन्हा एक मराठा नेतृत्व संपवले, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप - सुषमा अंधारे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून राजकारण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवले, असा थेट आरोपच सुषमा अंधारे यांनी केला. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)