शिदेंच्या एका आमदारानं आपल्याकडे खळबळजनक गौप्यस्फोट केल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. एका विमान प्रवासात त्या आमदारानं आपल्याला शिंदेंच्या मनस्थितीची माहिती दिली असंही राऊतांनी म्हंटलं आहे. संजय राऊतांनी नेमकं काय दावे केले आहेत आणि त्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेत्यांनी काय म्हंटलं?
अमित शहांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता? महायुतीच्या हाय कमांडने शब्द पाळला नसल्याने शिंदे नाराज? सामना वृत्तपत्राच्या रोखठोक या सदरामध्ये संजय राऊतांनी खळबळजनक दावे केले आहेत. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊनही अमित शहांनी तो पाळला नसल्याचं संजय राऊतांनी म्हंटलंय. एका विमान प्रवासात शिवसेनेच्याच आमदारानं आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा संजय राऊत यांचा आहे. पुन्हा मुख्यमंत्री पद मिळालं नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत का? असा प्रश्न संजय राऊतांनी शिवसेनेच्या त्या आमदाराला विचारला. त्यावर शिंदेंचा आमदार म्हणाला, ते त्याच्याही पलीकडे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत. शून्यात गेले आहेत. त्यानंतर शिंदे यांना धक्का बसला आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. त्यावर ते मनानं कोलमडले आहेत असं शिवसेना आमदारानं सांगितलं आहे. त्यावर नेमकं झालंय काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. त्यावर शिवसेनेच्या आमदारानं धक्कादायक दावा केला. निवडणुका तुमच्याच नेतृत्वात लढू आणि 2024 नंतरही तुम्हीच मुख्यमंत्री असाल चिंता करू नका. निवडणुकीमध्ये सढळ हस्ते खर्च करा. असं आश्वासन अमित शहा यांनी शिंदेंना दिलं होतं. शिंदेंनी निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा टाकला. पण अमित शहांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असं शिंदेंना वाटतंय असं तो आमदार राऊतांना म्हणाला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Feb 03, 2025 10:18 AM