शरद पवार अन् अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा:पुन्हा एकदा दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण

6 hours ago 2
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा गेली अनेक दिवस माध्यमांमध्ये सुरू आहे. यातच आज अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आले. मात्र काही दिवसांपासून काका-पुतण्यांमधील संबंध सुधारत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. नेमके काय घडले? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभेसाठी अजित पवार आणि शरद पवार आज एकत्र आले. यावेळी घाईघाईत आलेल्या अजित पवारांनी पीएला विचारले कुठे बसायचे आहे, यावर पीएने ‘साहेब इकडे आत बसलेत असे म्हणताच अजित पवार अध्यक्ष असा बोर्ड लावलेल्या दालनात गेले. यावेळी त्यांची शरद पवारांशी जवळपास अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. उद्धव ठाकरे - शरद पवार लवकरच मोदींसोबत- कडू बच्चू कडू म्हणाले की, देशात गत काही दिवसांपासून मोठ्या राजकीय उलथापालथी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयी आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसून येतील. या दोन्ही पक्षांकडे भाजपला आवश्यक असणाऱ्या जागा उपलब्ध आहेत. संजय राऊत यांच्या विधानातूनही हे अधोरेखित होते. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्यामुळे कुणीही पक्ष सोडून जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे. वर्षभरात हे दोघे एकत्र येतील, अजित पवारांच्या आईचा दावा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सपाटून मार खाल्ला. त्यानंतर अजित पवार-शरद पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या. 1 जानेवारी रोजी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी पवार कुटुंब एकत्र येऊ दे, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केल्याची माहिती दिली. तर . मला वाटतं की पांडुरंग माझं नक्की ऐकणार. वर्षभरात हे दोघे एकत्र येतील, असा दावाही त्यांनी केला. .. तर आम्हाला आनंदच- पटेल काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाच्या काही आमदारांनी केंद्रात आणि राज्यातही सत्ता नसेल तर विकास कामे होणे कठीण आहे, याची जाणीव झाल्याने आता अजित पवारांकडे चला, असा आग्रह धरला होता. तर नरहरी झिरवाळ यांनीही पवार कुटुंब एकत्र यावे, असा सूर लावला. ते म्हणाले की, हनुमानाची छाती फाडल्यानंतर जसा त्यात राम दिसला होता तशी माझी छाती फाडली तर त्यात शरद पवार दिसतील. शरद पवारांची भेट घेऊन त्यांना लोटांगण घालेन.अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार व अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच वाटेल, असे म्हटले आहे. पवार कुटुंब एकत्रित राहावे, माझी व्यक्तिगत इच्छा- रोहित पवार पवार कुटुंब एकत्रित रहावे, ही माझी व्यक्तिगत इच्छा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मात्र, राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही. आव्हाड, रोहित पाटील, जानकर मात्र विरोधात सत्ता नसल्याने पुढील 5 वर्षे मतदारसंघातील विकासकामे होणार नाहीत. मग पुढच्या निवडणुकीला सामोरे कसे जायचे, हा प्रश्न या नेत्यांना सतावतो आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करावे आणि संघटन अधिक मजबूत करून पुढची वाटचाल करावी, असे बहुतेकांचे मत आहे. जितेंद्र आव्हाड, राेहित पाटील आणि उत्तम जानकर या तिघांचा मात्र या प्रस्तावाला विरोध आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवावे आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, असे त्यांना वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुप्रिया सुळेंना राजी करण्याची तयारी शरद पवार यांच्या कुटुंबीयांपैकी एका लोकप्रतिनिधीचाही सत्तेसोबत जाण्याचा आग्रह सुरू असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. सुप्रिया सुळे यांनीही जाहीरपणे अनुकूलता दाखवली तर सत्तेसोबत जाण्याचा आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याचा मार्ग सुकर होईल, असे सांगण्यात येते आहे. जर बहुमताने सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला तर शरद पवार संघटनेपासून दूर होण्याचा निर्णयही घेऊ शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article