शरद पवारांचा अजित पवारांना दे धक्का; पुण्यातील दोन बडे नेते पवारांच्या भेटीला

2 hours ago 1

Sharad Pawar Vidhansabha Election 2024 : शरद पवार आज पुण्यात आहे. त्यांच्या भेटीसाठी काही नेते येत आहेत. यात अजित पवार गटातील दोन बड्या नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल होणार असल्याचे संकेत दिसत आहेत. वाचा सविस्तर...

शरद पवारांचा अजित पवारांना दे धक्का; पुण्यातील दोन बडे नेते पवारांच्या भेटीला

शरद पवार, अजित पवारImage Credit source: Facebook

| Updated on: Sep 30, 2024 | 10:30 AM

विधानसभा निववडणुकीआधी शरद पवारांनी रणनिती आखायला सुरूवात केली आहे. पुणे जिल्ह्यात नव्याने पक्षाला उभं करण्यासाठी त्यांनी रणनिती आखली आहे. जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. आद शरद पवार पुण्यात आहेत. पुण्यातील मोदी बागेत असणाऱ्या शरद पवारांच्या निवास्थानी नेते आणि कार्यकर्त्याची भेटीसाठी गर्दी झाली आहे. यातच अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.

दोन बडे नेते शरद पवारांच्या भेटीला

अजित पवारांचे दोन मोठे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत. पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील सरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती. विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात येत आहे. भोसरीत सहकार्य करावे रवी लांडगे आज शरद पवारांना विनंती करणार आहेत. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article