शासकीय मेडिकल कॉलेजला मिळाली मंजुरी:अखेर अमरावतीकरांचे स्वप्न झाले साकार; समितीच्या पाठपुराव्यास यश‎‎

2 hours ago 1
अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे आणि सर्व अमरावतीकर जनतेचे स्वप्न होते, ते आज साकार झाले आहे. मेडिकल कॉलेज कृती समिती व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाल्याचे म्हटले आहे. कृती समितीचे संयोजक, भाजप नेते किरण पातुरकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज व्हावे. यासाठी मेडिकल कॉलेज कृती समिती स्थापन केली होती. २०१६ ते २०२४ या काळात समितीने आंदोलने, उपोषण, निवेदन, सह्यांची मोहीम, विविध बैठकीचे सत्र आदींचे आयोजन केले होते. ठिकठिकाणी जनजागृती अभियान राबवले. महापालिका, जिल्हा परिषद व नगर पालिकांनी मेडिकल संबंधी ठराव पारित केला होता. एमआयडीसी असोसिएशनने यासाठी ठराव पारित केला. तीनशेहून अधिक राजकीय व सामाजिक संघटना या लोक चळवळीत उतरल्या होत्या. एक लाखापेक्षा अधिक़ स्वाक्षरी गोळा करून त्या तत्कालीन मुखय्मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचवल्या होत्या. मेडिकल कॉलेजसाठी शहरासह दहा ई क्लास जागा दाखवल्या होत्या. ११ जागांची एनओसी शासनाला दिली होती. कोरोनासह अनेक अडथळे या कार्यात आले. परंतु २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे मेडिकल कॉलेज होणार अशी घोषणा केली. मेडिकल कॉलेज खेचून आणण्याचे कार्य लोकप्रतिनिधींचे होते. परंतु त्यांनी यश मिळत असल्याचे दिसताच सरकारकडे यासंबंधीचे पत्र पाठवले. कृती समिती कार्यरत असताना मंजुरी मिळाल्यानंतर आता लोकप्रतिनिधी याचे श्रेय घेत आहे. कृती समितीच्या नावाचा उल्लेख संबंधितांनी न करणे योग्य नाही. मेडिकल कॉलेजचे श्रेय कृती समिती, अमरावतीकर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचे किरण पातुरकर यांनी म्हटले. या वेळी डॉ. बबन बेलसरे, डॉ. जयंत पांढरीकर, राजू लिखीतकर, दीपक पोहेकर, विशाल वानखडे, नंदकिशोर पटले उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article