शिक्षण हक्क सप्ताह:बालक देशाचे आधारस्तंभ; ते सुरक्षित राहायला हवेत- न्या. योगेश पैठणकर

2 hours ago 1
बालक हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यामुळे ते सुरक्षित असले पाहिजे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्या. योगेश पैठणकर म्हणाले. ते जिल्हा विधी प्राधिकरण, न्यू इंग्लिश हायस्कूल व जिजाऊ कन्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षण सप्ताहात बोलत होते. शिक्षण संकुलातील बाल दिनानिमित्त शिक्षण सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी दिवाणी न्यायाधीश व विधी सेवा प्राधिकरणचे सचिव योगेश पैठणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य माधव मुनशी होते. व्यासपीठावर बालहक्क संरक्षण आयोगाचे ॲड. श्री संजय सेंगर, ॲड. आरती गुरव, ॲड. एन. एन. उंबरकर, जिजाऊ कन्या विद्यालयाच्या प्रभारी कविता इंगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. बाल हक्क सप्ताह २० नोव्हेंबरपर्यंत साजरा होणार आहे. कार्यक्रमात चाइल्ड हेल्पलाइनच्या समन्वयक गजभिये यांनी १०९८ या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकाचे महत्त्व समजवून सांगितले. सूत्रसंचालन मिलिंद घोगले यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अंजली दंडे, श्रीकांत खंडारे, सचिन वारकरी, संजय अघडते, तुषार लाखपुरे, प्रताप चौहान, ज्योती कासमपुरे आदींनी परिश्रम घेतले. पोस्को कायद्यावर मंथन: बालकांच्या सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी आपण हा सप्ताह साजरा करात आहोत असेही न्या. पैठणकर म्हणाले. ॲड सेंगर यांनी बालकांची सुरक्षा यंत्रणा या विषयावर आपले मत मांडले. ॲड. उंबरकर यांनी पॉस्को कायद्याविषयी माहिती दिली. ॲड गुरव यांनी बालकांचे हक्क या विषयावर प्रकाश टाकला. िवद्यार्थ्यांनो मोबाईलचा वापर कमी करा विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर कमी करून शाळेच्या क्रीडांगणावर जास्त परिश्रम घेऊन शरीर व मन सुदृढ करावे, असे आवाहन प्राचार्य मुनशी यांनी केले. शालेय क्रीडाक्षेत्रातील विभागीय तथा राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या न्यू इंग्लिश हायस्कूल व जिजाऊ कन्या विद्यालयाच्या सहा संघातील खेळाडूंचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article