शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन वाढवून कोल्हे कारखान्याला स्वयंपूर्ण करावे:सहकारासमोर दिवसेंदिवस खासगी कारखान्यांचे संकट वाढतेय

2 hours ago 1
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आधुनिक बदलांचा वेध घेत येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करत उस उत्पादक सभासद शेतकरी, संचालक मंडळ, व्यवस्थापन, कामगार आदी सर्वच घटकांच्या सहकार्याने यशस्वी घौडदौड सुरू ठेवली असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. कार्यक्षेत्रात सभासद शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन वाढवून कारखान्याला स्वयंपूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी अध्यक्ष विवेक कोल्हे व रेणुका कोल्हे याच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते. विवेक कोल्हे म्हणाले, सहकारासमोर खासगीचे नवीन संकट दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाळप हंगाम सुरू होण्याआधी कारखानदारीला अनुरूप ध्येयधोरणे शासनाने घेतली, तर त्यानुसार साखर कारखानदारांना त्याचे नियोजन करता येते. अडचणींतील साखर उद्योग व बदलत्या स्पर्धांना तोंड देण्यांसाठी बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली कारखान्यांने विविध प्रकल्पांची उभारणी करत त्यातून अनेक उपपदार्थ तयार केले. देशात सर्वप्रथम उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन, दैनंदिन गाळपात थेट उपग्रहाचा वापर, सहवीज निर्माती, बायोगॅसपासुन सहवीज, उपग्रहाच्या अभ्यासातून थेट उस लागवडीपासून ते तोडणीपर्यंतचे नियोजन, सीएनजी गॅस, पोटॅश खत, मत्स्य संवर्धन, बांबू लागवड, संजीवनी सेंद्रीय खत, अॅसिटीक अॅसिडसह अॅसिटीक अनहैड्राईड, इथाईल अॅसिटेटचे प्रकल्प सुरू केले. त्यातून लवकरच उत्पादन घेतले जाणार आहे. चालू गळीत हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आवश्यक तेथे आधुनिकीकरण तंत्रज्ञानाचा वापर, अद्यावत बॉयलर, स्टीम वापरात काटकसर व शक्य तेथे दैनंदिन खर्चात बचतीचे धोरण संचालक मंडळासह व्यवस्थापनाने घेतले असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली. याप्रसंगी दत्तात्रय कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे, डॉ. शिरीष भट, मच्छिंद्र टेके, शिवाजी वक्ते, दीपक गायकवाड, त्र्यंबक परजणे, पांडुरंगशास्त्री शिंदे, संजय होन, राजेंद्र भाकरे, साखर सर व्यवस्थापक शिवाजी दिवटे उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वास महाले यांनी केले. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांनी आभार मानले. कारखान्याचा सीएनजी गॅस प्रकल्प कार्यान्वित होणार सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या वतीने जानेवारी २०२५ पर्यंत वाहनांसाठी लागणाऱ्या सीएनजी गॅसचा १२ टनी प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. कोल्हे साखर कारखाना आजवर उस भावात जिल्ह्यात सतत पहिल्या स्थानावर राहिलेला आहे, अशी माहिती कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article