संकट येण्यापूर्वीच त्याचा सामना करण्याची तयारी करा:‘नेतृत्व संवाद’ अंतर्गत व्याख्यानात डॉ. भरत केळकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
6 hours ago
1
खरे नेतृत्व गुण असणारी व्यक्ती येणाऱ्या संकटांचा वेध घेऊन त्यांच्याशी सामना करून ते येऊच नये यासाठी नियोजन करते. समजा संकट आलेच, तर अशा व्यक्ती संकटांची तिव्रता कमी करू शकतात. यासाठी चांगली मानसिकता हवी असते. मन नकारात्मकतेने भरलेले असल्यास आपण संकटांवर मात करू शकत नाही, संकटांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी वाटाघाटी कौशल्ये महत्वपूर्ण ठरतात, असे प्रतिपादन आर्थोपेडिक सर्जन डॉ. भरत केळकर यांनी केले. संजीवनी विद्यापीठ अंतर्गत स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या वतीने बीबीए, बी. कॉम व एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नेतृत्व संवाद’ या विषयावर व्याख्यान मालिकेचे आयोजन केले. या मालिकेत डॉ. केळकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रारंभी संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी डॉ. केळकर यांचा सत्कार केला. याप्रसंगी चिफ टेक्निकल ऑफिसर विजय नायडू, डॉ. सतीश अजमेरे, संजीवनी विद्यापीठाच्या प्रो व्हाईस चांसलर डॉ. जे जानेथ, डीन डॉ. कविथा राणी, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे डीन डॉ. विनोद मालकर, बीबीए विभागाचे प्रमुख प्रा. सुधांशू भट्ट आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. केळकर यांनी नेतृत्व, संकट व्यवस्थापन, वाटाघाटी, आदी विषयांना स्पर्श केला. संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतूक केले. डॉ. केळकर यांनी सिरिया, येमेन व इराकमधील युध्दांमध्ये स्वयंस्फूर्तीने जखमी जवानांना वैद्यकीय सेवा दिली. या सेवेचे व युध्दाची चित्तथरारक ध्वनीचित्रफित त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवली. कठीण परीस्थितही तेथे त्यांनी कशी सेवा दिली, याची माहिती दिली. डॉ. केळकर म्हणाले, नेतृत्व गुण जोपासण्यासाठी प्रत्येकाने दुसऱ्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला, तर तो आपला होतो. आपले मन एककल्ली राहूच नये यासाठी मनाची लवचिकता हवी. हा आपला लवचिक स्वभाव तयार करण्यासाठी ध्यानधारणा करावी. संकट अथवा संघर्षाच्या वेळी ध्यानधारणेमुळे मन शांत राहते. प्रभावी संकट व्यवस्थापनाची सुरुवात स्वतःपासून करा. आपण भावनांचे व्यवस्थापन केले पाहिजे. आपल्याला संघटक होऊन नेतृत्व करायचे असेल तर अगदी टोकाच्या प्रसंगातही शब्द जपून वापरावे. केवळ जिंकण्यावर भर न देता शांत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रा. सुधांशू भट्ट यांनी आभार मानले. संजीवनी विद्यापीठात व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ. भरत केळकर.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)