सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणPudhari photo
Published on
:
02 Feb 2025, 8:15 am
Updated on
:
02 Feb 2025, 8:15 am
बीड पुढारी वृत्तसेवा : बीडच्या मसाजोग येथील संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेण्यासाठी भगवानगडाकडे रवाना झाले आहेत. महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. यानंतर आता देशमुख कुटुंब पुरावे घेऊन गेले आहेत.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. यातील एक आरोपी अद्यापही फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे राजकीय क्षेत्रात देखील आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तर धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची विरोधकांकडून मागणी केली जात आहे. यादरम्यान धनंजय मुंडे यांनी भगवानगड येथे मुक्कामी जात त्या ठिकाणी महंतांची भेट घेतली होती. यानंतर महंतांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. तसेच धनंजय मुंडे यांनी देखील गड पाठीशी उभा असल्याचे म्हटले होते. यानंतर पुन्हा आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडू लागल्या असून आता देशमुख कुटुंब त्यांच्याकडे असलेले पुरावे घेऊन महंतांची भेट घेणार आहेत.