सट्टा बाजारात ‘पश्चिम’बद्दल संभ्रम; ‘मध्य’,‘पूर्व’मध्ये महायुतीला कौल:50 कोटी रुपयांचा लागला सट्टा; फक्त कोण जिंकणार याचेच भाव झाले खुले

5 hours ago 1
गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरची लढत ही दुरंगी असल्यामुळे सट्टा बाजारातही कोण जिंकणार आणि कोण हरणार यावर पैसे लागत होते. मात्र, या वेळी तिरंगी लढत झाल्यामुळे सट्टा बाजारातले बुकीदेखील निकालाबाबत संभ्रमात आहेत. त्यामुळे कोण जिंकणार व कोण हरणार यावर सट्टा बाजारात भाव खुला केलेला नाही. त्याऐवजी फक्त कोण जिंकणार यावर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, क्रिकेट असो की बाजारभाव, निवडणुकांचे सट्ट्याचे भाव दुपारी २ वाजता सगळ्यांना पाठवले जातात. मात्र संभाजीनगरमधील निकालाचा अंदाज लावता येत नसल्यामुळे गुरुवारी (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी पाचपर्यंत उमेदवारांचे भाव ठरत नव्हते. पहिल्यांदा सर्व उमेदवारांना ६५ पैसे हा दर लावण्यात आला. नंतर सातच्या सुमारास मात्र मध्य, पूर्व, पश्चिम, कन्नड, सिल्लोड या मतदारसंघाचे भाव जाहीर करण्यात आले. त्यातही ‘लगाने का’ दर जाहीर केला. ‘खाने का’ दर उघडण्यात आला नाही. जालन्याच्या लोकांनी लावला संभाजीनगरात सट्टा छत्रपती संभाजीनगरची निवडणूक मराठवाड्यात चुरशीची राहिली. ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त सट्टा यावर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे जालन्यातील अनेक सट्टेबाजांनी संभाजीनगरातील उमेदवारांवर पैसे लावल्याची माहिती आहे. रात्री उशिरा राज्यात सरकार कुणाचे स्थापन होईल याचा भाव खुला करण्यात आला. बुकींचे फेव्हरिट कोण? सट्ट्यात पैसे लावताना फेव्हरिट पार्टी म्हणून एकाचा दर घोषित केला जातो. याला ‘लगाने का’ दर म्हणतात. ४० पैसे दर जाहीर झाला, तर जेवढे पैसे लावले जातील त्यावर ४० टक्के जास्त मिळतात. उमेदवाराच्या पराभवावर लावण्यात येणाऱ्या सट्ट्यासाठी ‘खाने का’ दर जाहीर करण्यात येतो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article