झगमगत्या विश्वात प्रेग्नेंसीनंतर कायम अभिनेत्रींच्या वाढलेल्या वजनावर चर्चा होत राहतात. नुकताच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने यावर मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा उल्लेख करत स्वरा हिने मोठं वक्तव्य केलं आहे. स्वरा म्हणाली, आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. पण काही दिवसांनंतर अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिनय विश्वात पुन्हा पदार्पण केलं.
स्वरा भास्कर हिने 2023 मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर सोशल मीडियावर अभिनेत्रीला वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं. अभिनेत्री म्हणाली, ‘प्रत्येक सेलिब्रिटी महिलेला डिलिव्हरीनंतर बॉडी शेमिेंगचा सामना करावा लागतो…’
‘ऐश्वर्या हिला देखील बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. ऐश्वर्या राय हिच्याकडून मी मोठी शिकवण घेतली आहे..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. जर ऐश्वर्यासारखी सुंदर महिला आणि तिच्यासारख्या सेलिब्रिटीला अशा नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो, तर मलाही या गोष्टीचा सामना करावा लागेल.
ऐश्वर्याचा उल्लेख करत स्वरा म्हणाली, ‘इंडस्ट्रीमधील लोकांच्या मानसिकतेबद्दल सांगायचं झालं तर, ग्लॅमरच्या विश्वात महिलांना कधीच एकटं सोडलं जात नाही. प्रत्येक महिलेला पावलोपावली जज केलं जातं, मग ते महिलेचं खासगी आयुष्य असो, करिअर असो किंवा तिचं मातृत्व असो.’ सध्या सर्वत्र स्वरा भास्कर हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, स्वरा भास्कर आपल्या स्पष्टवक्ते पणा बद्दल प्रसिद्ध आहेत, अभिनेत्री खूप काळापासून राजकीय विषयावरील आपली मते मोकळेपणे मांडत आल्या आहेत. त्यांनी अनेकदा सरकार विरोधी निदर्शनात सहभाग घेतला आहे. स्वराने फेब्रुवारी २०२३ मध्ये समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी विवाह केला आहे, दोघांना एक मुलगी आहे.
ऐश्वर्या आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोश मीडियावर ऐश्वर्या आणि आराध्या यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय ऐश्वर्या देखील स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.