गव्यांचा कळप
Published on
:
01 Feb 2025, 1:46 am
Updated on
:
01 Feb 2025, 1:46 am
कवठेपिरान ः मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे शुक्रवारी गव्यांचा कळप दिसला. वन विभागाकडून भागात दिवसभर शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गवे पकडण्यात वन विभागाला यश आले नाही.
कवठेपिरान - कारंदवाडी रस्त्यावर हॉटेल साईराजशेजारी असलेल्या शेतामध्ये शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हॉटेलमधील कामगारांना जनावर ओरडत असल्याचा आवाज आला. ते बाहेर आल्यानंतर समोर तीन गव्यांचा कळप दिसला. गावकर्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र शोध घेण्यासाठी गावात दाखल झाले. मात्र तोपर्यंत कवठेपिरानमधून हा कळप तुंग आणि त्यानंतर कसबे डिग्रजमधील शेतात गेला, अशीही चर्चा होती. वन विभागाकडून या भागात दिवसभर शोध सुरू होता. मात्र रात्री उशिरापर्यंत गवे सापडले नाहीत. गव्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. यापूर्वी या भागात बिबट्या, तरस आणि गवे आले होते, अशी माहिती काही शेतकर्यांनी दिली.