सायकलचा ब्रेक तोडण्याच्या कारणावरुन तरुणास केली चौघांनी मारहाणPudhari Photo
Published on
:
09 Oct 2024, 10:54 am
Updated on
:
09 Oct 2024, 10:54 am
सोलापूर : घराजवळ खेळत असताना सायकलचा ब्रेक तोडण्याच्या कारणावरुन बालाजी कन्हाळे व इतर चारजणांनी मिळून मारहाण केल्याने वैभव अर्जुन कोकणे (वय ११, रा. कलावतीनगर, एमआयडीसी) हा जखमी झाला. उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.
पाय घसरून पडल्याने जखमी घरी बाथरूमला गेल्यावर पाय घसरून पडल्याने आनंद अरुण वाघमारे (वय ३२, रा. सतनाम चौक, लष्कर) हे जखमी झाले. उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.
अज्ञात कारणावरून वृद्धास मारहाण
मूकबधिर शाळा बिरोबा मंदिर, लोधी गल्ली येथे अज्ञात कारणावरून परशा माने याने नागमनी अशोक यलूलवार (वय ६२, रा. लष्कर) यांना मारहाण केली. त्यांना उपचारासाठी सिव्हिल येथे दाखल केले.
लहान मुलांच्या भांडणातून मारहाण
सायकलचा ब्रेक तोडण्याच्या कारणावरुन मुलांच्या भांडणात रवी मैनावाले व बबिता कोकणे यांनी काका पांडुरंग कानडे (५२), प्रभावती काका कानडे (४५, रा. कलावतीनगर, एमआयडीसी) यांना मारल्याने जखमी झाले. उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.