सोन्याच्या किमतीत घट; लग्नसराईत दिलासा:24 कॅरेटमध्ये 5 हजार, तर चांदीत 9 हजार रुपयांपर्यंत झाली घसरण
6 days ago
2
तुळशी विवाहापासून लग्नसराईला सुरुवात झाली आहे. दरम्यान दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना लग्नसराईच्या दिवसात स्वस्तात सोनं खरेदी संधी मिळाली आहे. वर्षभर वाढणाऱ्या किंमती जरा खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिन्याच्या सुरुवातीला २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जवळपास ७९ हजारांवर जाऊन पोहोचला होता, मात्र हाच दर आता ७५ हजारांच्या आसपास आला आहे. तर चांदीचा दर ९९ हजारांवरून आता थेट ९० हजारांवर येऊन स्थिरावला आहे. तसेच गुरुवारीही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. स्थानिक बाजारापर्यंत सर्वच सोन्याच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे.आठवड्याभरापासून सोन्या-चांदीचे दर घसरत असल्याने ग्राहकांनी सराफा दुकानाकडे धाव घेतली आहे. गुरुवारी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,९०० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९०,००० रुपये आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा दर ७३४०० रुपये आहे. आठवड्यात सोन्याच्या दरात ४ ते ५ हजारापर्यंत कमी झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल ९ ते १० हजाराची घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. ज्या घरात लग्न समारंभ होणार होऊ घातले आहेत, अशा लोकांनी सोने खरेदीला पसंती दिली आहे. २४ कॅरेट सोने २२ कॅरेट सोने चांदी ३ नोव्हेंबर ७९,९५० ७८,३५० ९९,५०० १४ नोव्हेंबर ७४,९०० ७३,४०० ९०,००० असे झाले दर कमी एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोनं जवळपास ३ हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर आदल्यादिवशी तुलनेत हा दर दोन हजारापर्यंत कमी झाला आहे. त्याचप्रमाणे आठवड्याभरापूर्वी ९५ हजारांपर्यंत पोहोचलेला चांदीचा दर आज जवळपास ५८०० रुपयांनी कमी झाला आहे. तर आदल्या दिवशीच्या तुलनेत हा दर ६३० रुपयांनी घसरला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)