सोयाबीनला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी प्रचंड नाराज अन् तणावाखाली आहेत. कुणी आत्महत्या करतोय तर कुणी कर्ज काढून जीवन जगत आहे. गेल्या १० महिन्यांत विदर्भात ११६२, तर मराठवाड्यात ७५७ अशा एकूण १९१९ शेतकऱ्यांनी (शासनाच्या अहवालानुसार) आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांची सर्वाधिक बिकट परिस्थिती मराठवाड्यात आहे. कारण सोयाबीनचा राज्यात सर्वाधिक २४ लाख ८७ हजार हेक्टरवर पेरा याच भागात आहे. यंदा काढणीच्या वेळीच परतीच्या पावसाने सोयाबीन भिजले. त्यामुळे ते हातातून गेले. जे काही हाती आले त्यात आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. शासनाची अट मात्र १२% आर्द्रतेची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ४८९२ रुपयांचा हमीभाव मिळत नाही. नाइलाजास्तव व्यापाऱ्याकडे ३५०० ते ४२०० रुपये दराने विक्री करावे लागतेय. परिणामी शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसतोय. त्याचा फटका राज्यातील १५ जिल्ह्यांतील ८० विधानसभा मतदारसंघांत सत्ताधाऱ्यांना बसण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. आता सत्ताधारी व विराेधकांकडून आश्वासने दिली जात आहेत.
अडचण : मक्याची पेंड सोयाबीनपेक्षा स्वस्त सोयाबीन बियाणे, खतांचे दर वाढले, तर दुसरीकडे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, बुरशीजन्य रोगामुळे उत्पादन घटतेय. बाजारात भावही कमी मिळतोय. सोयाबीनची पेंड ४२, तर मक्याची १४ रुपये किलो भाव आहे. मका स्वस्त असल्याने त्याला अधिक मागणी आहे. हे आहेत पर्याय : 1. किमान ७,००० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करावी. 2. १५ % आर्द्रता असलेले सोयाबीन खरेदी करावे. 3. मका निर्यातीसाठी १,००० रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा. 4. सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नाफेडने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे, शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी. ४९ लाख हेक्टरवर उत्पादन राज्यात ४९ लाख ८ हजार हेक्टरवर उत्पादन मराठवाडा - २४ लाख ८७ हजार हेक्टर विदर्भ- १७ लाख ६३ हजार हेक्टर पश्चिम महाराष्ट्र- ६ लाख ५८ हजार हेक्टर. मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांत तर विदर्भातील ६ जिल्ह्यांत सोयाबीनचा पेरा अधिक आहे. हे आहेत ८० मतदारसंघ मराठवाड्यात ८ जिल्ह्यांतील ४६ विदर्भातील (पश्चिम विदर्भातील सर्वाधिक ३० मतदारसंघ) ३४ अशा एकूण ८० विधानसभा मतदारसंघांत सोयाबीन घेतले जाते. हमीभाव तर द्या १० वर्षांत उत्पादन खर्च हा दरवर्षी वाढत आहे. त्या तुलनेत सोयाबीनच्या बाजारभावाला योग्य भाव मिळत नाही. किमान हमीभाव दिला पाहिजे.
-राहुल ठाकरे, शेतकरी, वाशिम लवकरच दिलासा वाढलेल्या आर्द्रतेसह सोयाबीन खरेदीसाठी तसेच निर्यातसाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न सुरू आहे. दिलासा मिळेल.
-पाशा पटेल, राज्य कृषी मूल्य आयोग, अध्यक्ष आश्वासने : ७००० भाव, १५ % आर्द्रताही चालेल
सोयाबीनला प्रतिक्विंटल ७,००० रुपये भाव देऊ असे काँग्रेस तर महायुती ६,००० रुपयांचे आश्वासन देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोयाबीनला आधारभूत किंमत देऊ, १५% आर्द्रता असलेले सोयाबीनही खरेदी करू, पेंड निर्यातीलालाही परवानगी देऊ, असे म्हटले. फटका : उत्पादन खर्चही निघेना, कर्ज वाढले जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात ७५७, तर विदर्भात ११६२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, त्यामुळे कर्जाचा वाढलेला बोजा, सोयाबीन, कापूस व इतर पिकांना मिळत असलेला अल्प भाव, नापिकी आदी कारणे आहेत. वास्तव : हमीभाव मिळेना व्यापारी करताहेत लूट शासनाने हमीभाव ४८९२ रुपये जाहीर केला आहे. मात्र शेतकऱ्यांना आर्द्रतेचे प्रमाण १२ पेक्षा जास्त अन् प्रतवारी खराब असल्याचे कारण पुढे करत शेतकऱ्यांना ३५०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. व्यापाऱ्यांकडून लूट केली जात आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. कारण : हमीभाव ~४८९२, मिळतात ३५०० ते ४२००, १२ % आर्द्रतेची अट अडचणीची । परिणाम : मराठवाडा-विदर्भात १९१९ शेतकरी आत्महत्या
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)