हतनूर प्रकल्पात येणाऱ्या 1453 घरांची पुनर्वसन प्रक्रिया रखडली:301 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याची मंत्र्यांकडे मागणी

2 hours ago 1
पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. सदर प्रस्तावांना जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता प्राप्त झालेली आहे. सदर प्रस्ताव शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या मान्यतेस सादर करण्यात आलेला आहे. तरी सदर प्रस्तावास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी त्यांच्या स्तरावरून मंजुरी द्यावी अशी विनंती केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. सदरील प्रस्ताव शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या शिफारसीने मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. हतनूर प्रकल्पामुळे सतत बॅकवॉटरच्या संपर्काने जमिनी हानीकारक झाल्या आहेत. फुगवट्याच्या पाण्यामुळे घरात सतत ओल असल्याने व विषारी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास होत आहे. पाण्यामुळे जमिनीची झीज होत असल्याने या गावांच्या घरांचे संपादन व पुनर्वसन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मंत्री रक्षा खडसे यांनी केली. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन देताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे. प्रतिनिधी | मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील काही गावांचे संपादन व पुनर्वसनाची प्रक्रिया रखडली आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी ३०१.३७ कोटींच्या खर्चास शासनाची मान्यता मिळावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेतली. हतनूर प्रकल्पात प्रभावित गावांमधील संपादन व पुनर्वसन करण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळणेबाबत तापी पाटबंधारे विकास महामंड‌ळाच्या नियामक मंडळाच्या ६७व्या बैठकीत मान्यता प्रदान केली आहे. त्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद हतनूर प्रकल्प (उर्ध्व तापी टप्पा क्र.१) करीता मुक्ताईनगर तालुक्यातील ४१३ घरांसाठी ११० कोटी व रावेर तालुक्यातील नेहेते येथील १२८ घरांसाठी २४.९४ कोटी, वाघाडी येथील ४६३ घरांसाठी १००.९३ कोटी, ऐनपूर २५० घरांसाठी ३९.२० कोटी, भामलवाडी १९९ घरांसाठी २६.४६ कोटी असे एकूण ३०१. ३७ कोटी रुपयांचे खर्चाची आवश्यकता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article