महेंद्र गायकवाड यांनी निकालावर आक्षेप घेत मैदान सोडले आहे. तर मॅट विभागाच्या अंतिम लढतीमध्ये गोंधळ पाहायला मिळाला आहे. पराभवानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांनाच लाथ मारली आहे. तर शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीने पराभूत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ 67वा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. अंतिम लढतीमध्ये महेंद्र गायकवाडने मैदान सोडल्याने पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले आहे. मात्र महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालाय. मॅटवरील कुस्ती प्रकारात पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षेमध्ये अंतिम सामना रंगला. दोन्ही बाजूंच्या समर्थकांच्या घोषणा आणि हालगीचा निनाद आकाशात गुंजला. मोहोळ आणि राक्षेने दंड पकडून आणि बुक ठोकून कुस्तीला सुरुवात केली आणि अवघ्या 40 सेकंदात पृथ्वीराज मोहोळने शिवराज राक्षेला मॅटवर आपटलं. पंचांनी पृथ्वीराज मोहोळच्या बाजूने निर्णय दिला आणि तिथेच मोठ्या गोंधळाला सुरुवात झाली. पाठ पूर्ण टेकली नव्हती, आम्हाला निर्णय मान्य नाही, तुम्ही रिव्ह्यू पाहा अशी मागणी राक्षे आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली. पण त्याकडे दुर्लक्ष करत मोहोळला विजयी घोषित करण्यात आलं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. याच रागअनावर झाल्याने शिवराज राक्षेने थेट पंचांची कॉलर पकडली. वाद वाढला आणि शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली. देशपातळीवर कुस्तीमध्ये 15 वर्ष काम केलेल्या एका ज्येष्ठ प्रशिक्षकाने तर आपण असा निर्णय कधीच पाहिला नाही. एक कोटी रुपये ठेवतो असं आव्हानच दिलंय. बघा नेमकं काय घडलं?
Published on: Feb 03, 2025 11:03 AM