शिर्डीच्या साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकूने भोसकून निर्घृपणे हत्या करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या. या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या हत्याकांडामुळे शिर्डी चांगलीच हादरली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुभाष साहेबराव घोडे व नितीन कृष्णा शेजुळ अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर कृष्णा देहरकर असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. कृष्णावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहत. मृत कर्मचारी व जखमी तरुण सोमवारी पहाटे साई संस्थानच्या आपल्या नोकरीवर येत होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात सुभाष व नितीन हे दोघेही जागीच ठार झाले. या दोघांवर तासाभराच्या अंतराने हल्ला करण्यात आला. हा हल्ला कशामुळे झाला? हे स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे अवघी शिर्डी हादरली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना त्याची माहिती कळवली. पण पोलिसांनी तासभर विलंबाने घटनास्थळ गाठल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. इथे कुणीही कुणासाठी लगबगीने येत नाही, असा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला. या हत्येला अपघाताचे स्वरुप देण्यात येत असल्याचा आरोपही या प्रकरणी केला जात आहे. मृत सुभाष घोडे हे शिर्डीच्या करडोबा नगर चौकात राहत होते. त्यांच्यावर घरापासून काही अंतरावरच हल्ला करण्यात आला. तर नितीन शेजुळ व कृष्णा देहरकर यांच्यावर श्रीकृष्ण नगर भागात हल्ला झाला. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. या तरुणांची हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आली का? याचाही तपास घेतला जात आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे, आलोकनाथ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दुसरीकडे, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अभिनेता आलोक नाथ व श्रेयस तळपदे यांच्यासह 7 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्वांविरुद्ध गोमतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर एलयूसीसी कंपनीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 45 जणांकडून 9 कोटींहून अधिक रुपयांची रक्कम हडपल्याचा आरोप आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना 6 वर्षांत त्यांचे पैसे दुप्पट करण्याची ऑफर दिली होती. अनिस अहमद यांच्या तक्रारीवरून, दोन्ही कलाकारांसह कंपनीच्या कोअर टीमचे सदस्य डॉ. उत्तम सिंह राजपूत, व्यवस्थापक समीर अग्रवाल अशा एकूण 7 जणांविरुद्ध बीएनएस कलम 409 व 420 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस लवकरच आलोक नाथ व श्रेयस यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत. काय आहे प्रकरण? तक्रारीत अनिसयांनी म्हटले आहे की, आठ वर्षांपूर्वी उत्तम सिंह राजपूत यांची भेट झाली होती. त्यांच्या सांगण्यावरून एलयूसीसी कंपनीत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. ही रक्कम 6 वर्षांत दुप्पट होईल, असे सांगण्यात आले होते. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत एलयूसीसी नोंदणीकृत आहे. याचा प्रचार आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे करतात.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)