हायड्रोजन, बायोगॅसवर चालणाऱ्या दुचाकी येणार:राजीव बजाज यांचा दावा, संशोधन सुरू असल्याची दिली माहिती
3 hours ago
1
पर्यावरण पूरक इंधनाचा वापर करणे बदलत्या काळात महत्वपूर्ण असून त्यादृष्टीने जगात प्रथमच बजाज समूहाने सीएनजी आधारित दुचाकी बनवली आहे. त्याचप्रमाणे आता हायड्रोजन इंधनावर आधारित वाहन निर्मितीसाठी आम्ही संशोधन करत आहोत. अमूल संस्थेने गुजरात मध्ये बायोगॅसवर आधारित मोठा प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे बायोगॅसवर आधारित देखील दुचाकी निर्मिती होऊ शकेल का? या दृष्टीनेही आम्ही संशोधनात्मक प्रयत्न करू, असे मत बजाज समूहाचे चेअरमन राजीव बजाज यांनी व्यक्त केले आहे. बजाज समूह तर्फे आयोजित अमूल क्लीन फ्युएल रॅली उद्घाटन प्रसंगी ते आकुर्डी येथील बजाज कंपनीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अमुलचे मॅनेजिंग डायरेक्टर जयेन मेहता , बजाज समूहाचे संचालक राजीव बजाज , निर्मला वर्गीस कुरियन, अमित व्यास उपस्थित होते. राजीव बजाज म्हणाले, माझे वडील पद्मभूषण राहुल बजाज यांनी देशात स्कूटर निर्मिती केली. त्याच प्रमाणे वर्गीस कुरियन यांनी देशात दूध उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी विविध संशोधन करून ग्रामीण अर्थकारणास चालना दिली. बजाज 22 वर्षापूर्वी कोणत्याही देशात निर्यात करत नव्हते पण आज जगातील 120 देशांना वाहन निर्यात करत आहे. आत्मनिर्भर भारत दृष्टीने चालना देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. अमूलने देखील वेगवेगळे दुधाचे उत्पादन निर्माण केले असून त्यांचे चॉकलेट दर्जेदार आहे. अमूल चीजची चव देखील अनेकांना आवडत असल्याचे दिसून येते. उद्योगांचा माध्यमातून नागरिकांच्या जीवनात बदल घडण्यास मदत झाली पाहिजे. एआय हे नवीन तंत्रज्ञान सध्या आले असून त्याचा वापर देखील वाढत आहे. बजाजने जगातील पहिली सीएनजी दुचाकी काढलेली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. निर्मला कुरियन म्हणाल्या, माझे वडील वर्गीस कुरियन यांनी दूध क्रांती केली. अमूलचा माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवन बदलण्यास मदत झाली आहे. ग्रामीण आणि शहरी भाग एकमेकांना जोडण्यास त्यामाध्यमातून सहकार्य झाले आहे. जयेन मेहता म्हणाले, या रॅली माध्यमातून 12 जण पुणे ते दिल्ली दरम्यान बजाज सीएनजी दुचाकीवर प्रवास करणार आहे. पुणे, जम्मू , अहमदाबाद आणि कोलकाता याठीकानावरून रॅली आयोजित करण्यात आली असून दिल्ली याठिकाणी २४ नोव्हेंबर रोजी सर्व रॅली एकत्रित येतील. अमुलने देशात मागील आठ दशकात ग्रामीण भागात दूध उत्पादक यांच्या सोबत अमुलाग्र काम केले आहे. देशात स्वातंत्र्यानंतर अनेक ब्रँड झाले पण अमूल सारखा ग्रामीण अर्थकारण बदलणारा विश्वासू ब्रँड निर्माण झाला नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)