हिंदू धर्मावरील आक्रमण थांबवा- महंत रामगिरी:धर्म जागरण ट्रस्टच्या वतीने आयोजित मांजरसुंभा ते मायंबा येथे नाथ जागृती यात्रेची सांगता
5 hours ago
1
राज्यात सर्वात जास्त धर्मातराने आपल्या जिल्ह्यात होत आहे. आजपर्यंत आपल्या चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे हे घडत आले, पण आता हिंदूंनी जागृत राहून जिल्ह्यात हिंदू धर्मावर होणारे आक्रमण थांबवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. धर्म जागरण ट्रस्टच्या वतीने आयोजित नाथजागृती यात्रेची सांगता मायंबा येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी धर्मजागरण प्रांत सहसंयोजक मिलिंद वाईकर, श्रीक्षेत्र मायंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, बाबासाहेब म्हस्के, विश्वस्त जालिंदर कदम, श्रीक्षेत्र मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड आदी उपस्थित होते. महंत रामगिरी महाराज म्हणाले, की जिल्ह्यासह इतर भागात हिंदूच्या जागेवर वक्फ बोर्ड ताबा मारण्याचा प्रयत्न करीत आहे. धर्मांतर रोखण्यासाठी ही यात्रा काढली होती. मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट, मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट व मायंबा येथील मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने ही यात्रा काढण्यात आली. श्री गोरक्षनाथ गडावर रथपादुका पूजन व महाआरतीने नाथ जागृती यात्रेस प्रारंभ झाला. संध्याकाळी चिंचोडी येथे मुकाम, मिरवणूक व महाप्रसाद झाला, दुसऱ्या दिवशी दुपारी मढी येथे पोहोचून संध्याकाळी मायंबा येथे यात्रेची सांगता झाली. यात्रेदरम्यान पत्रकाचे वाटप करण्यात आले. त्या म्हटले आहे, की परकीय आक्रमणापासून सनातन धर्माच्या रक्षणाचे महत्कार्य करणारा नाथ संप्रदाय, मात्र आज धर्मांतराची काळी छाया या महान परंपरेवर आणि नाथ मंदिरांवर पडू लागली आहे. नाथ संप्रदायाची अनेक पवित्र ठिकाणे काबीज करण्याचे प्रयत्न होत आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणण्याचे षडयंत्र होत आहे. आता जागे होण्याची, मतभेद विसरून धर्म रक्षणासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे. आपला धर्म सोडून गेलेल्या लोकांना परत आणून त्यांच्या घरात भगवंताला पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचे पवित्र कार्य करायचे आहे. ही संपूर्ण हिंदू समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. नाथांची महान परंपरा प्रत्येक नाथ भक्ताला कळकळून पुकारत आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)