Published on
:
18 Jan 2025, 6:21 am
Updated on
:
18 Jan 2025, 6:21 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय लोकांची जीवनदायीनी म्हणजे भारतीय रेल्वे. या रेल्वेने रोज करोडो लोक आपल्या विविध कामासाठी प्रवास करतात. आता या रेल्वेच्या आणखी एका विक्रमात भर पडली आहे. त्यात म्हणजे हैदराबाद मेट्रोला मोठे यश मिळाले. मेट्रो केवळ प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत नाही तर आरोग्य क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावते. हैदराबादमध्ये अशी एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये मेट्रोने फक्त 13 मिनिटांत 13 किलोमीटरचे अंतर कापत, धडधड करणारे 'हृदय' प्रत्यारोपणासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. या संदर्भात एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
13 मिनिटांमध्ये 13 स्थानके केली पार
याबद्दल अधिक माहिती अशी कि, हैदराबाद मेट्रो हृदय प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॉर सुविधा प्रदान करते. या कॉरिडॉरद्वारे दात्याचे हृदय एलबीमध्ये हस्तांतरित केले जाते. हैदराबाद मेट्रोने जीवनरक्षक मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आणि अखंड वाहतूक सुविधा प्रदान केली. त्याला शहरातील कामिनेनी रुग्णालयातून लक्के पुल परिसरातील ग्लेनिगल्स ग्लोबल रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मेट्रोने 13 किलोमीटरचे अंतर 13 मिनिटांत पूर्ण केले. यामध्ये 13 स्थानकांमधून जात या जीवनरक्षक मोहिमेत बराच वेळ वाचला. त्यामुळे एका रुग्णाला जीवनदान मिळाले.
'हृदय' एका वैद्यकीय पेटीतून नेले
ही घटना 17 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता घडली. कामिनेनी हॉस्पिटलच्या टीमने दात्याचे हृदय एका मेडिकल बॉक्समध्ये ठेवले आणि मेट्रोने ते ग्लेनेगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे हृदय प्रत्यारोपण केले जाणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी मेट्रोमधून प्रवास करताना दिसत आहेत.
#WATCH | Hyderabad, Telangana: Hyderabad Metro facilitated a green corridor for heart transportation on 17th January 2025 at 9:30 PM. The corridor facilitated the swift and seamless transportation of a donor heart from LB Nagar’s Kamineni Hospitals to Gleneagles Global Hospital,… pic.twitter.com/wFWMZ0A3ZT
— ANI (@ANI) January 17, 2025ग्रीन कॉरिडॉर सुविधा म्हणजे काय?
ग्रीन कॉरिडॉर ही एक विशेष वाहतूक व्यवस्था आहे. जी अवयव प्रत्यारोपणासाठीच्या वाहतुकीसाठी वापरली जाते. जेव्हा एखाद्या रुग्णाला जीवनावश्यक अवयव जसे की हृदय, यकृत, मूत्रपिंड तातडीने प्रत्यारोपण करायचे असते, तेव्हा अवयव वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला जातो. ही सेवा फक्त काही विशेष शहरांमध्ये पुरवली जाते.
ग्रीन कॉरिडॉर कसा तयार केला जातो?
पोलिस आणि वाहतूक विभागाचा समन्वय: पोलिस विशिष्ट मार्गावर वाहतूक नियंत्रित करून मोकळा मार्ग उपलब्ध करून देतात.
वेगवान वाहतूक: अवयव वाहून नेणाऱ्या वाहनाला सिग्नल-मुक्त, थांबा-रहित मार्ग दिला जातो.
वेळेची बचत: अवयव वाहतूक लवकरात लवकर करण्यासाठी, जिथे शक्य असेल तिथे उड्डाण पूल आणि एक्सप्रेस 'वे'चा वापर केला जातो.