१ ते ३ जानेवारी भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रमाची तयारी:१४ वर्षांपासून साकारतात भीमा कोरेगाव प्रतिकृती

3 hours ago 1
मागील १४ वर्षांपासून शहरातील सायन्सकोर मैदान येथे भीमा कोरेगाव प्रतिकृती मानवंदना कार्यक्रम होणार आहे. समता सैनिक दल, माजी सैनिक संघटना व भीमा कोरेगाव मानवंदना आयोजन समितीद्वारा १, २, ३ जानेवारीला सायन्सकोर मैदान येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गत १४ वर्षांपासून ज्या दानदात्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली त्या सर्वांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या वर्षी कार्यक्रमाचे विशेष आकर्षक म्हणून मुंबई येथील अमोल घोडके, प्रबुद्ध जाधव, गीत बागडे, विश्वजा जाधव, प्रतीक सोरसे, डॉ. कुणाल इंगळे व चंद्र शिंदे, गायक अजय देहाडे आदी गायक कलाकार बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. यंदाही सिद्धनाक महार यांचे तेरावे वंशज मिलिंद इनामदार उपस्थित राहणार आहेत. तसेच लंडनवरून बहेल येणार आहेत. माजी प्रधान आयकर आयुक्त सुबचन राम, प्रशासकीय अधिकारीही कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पूर्व तयारीची बैठक झाली आहे. या बैठकीला प्रतिकृती मानवंदना समिती प्रमुख कैलास मोरे, समता सैनिक दल प्रमुख रवी नागले, देवेंद्र खांडेकर, माजी सैनिक संघटनेचे अविनाश गायकवाड, सतीश नाईक, वसंत गवई, बी. आर. धाकडे, अॅड. मनीष शिरसाट, समाधान वानखडे, संजय थोरात, कपिल धवणे, योगेश घुगरे, शिवा प्रधान, सुभाष गडलिंग, कांचन आटोळे, मेघा ढबाले, सुशीला नागदिवे, प्रतिभा प्रधान. प्रतिभा वानखडे आदी उपस्थित होते, असे कळवण्यात आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article