2019 मध्ये सर्वात कमी मताधिक्य, यंदा विक्रमी विजय:कोपरगाव विधानसभेत गतवेळी 822 मतांनी विजय, यंदा सव्वालाखाचे मताधिक्य
2 hours ago
1
मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ८२२ मतांनी विजयी झालेल्या आमदार आशुतोष काळे यांनी यंदाच्या निवडणुकीत विक्रम प्रस्तापित केला. यंदा त्यांनी १ लाख २४ हजार ६२४ येवढे मताधिक्य घेतले, कोपरगावच्या इतिहासात आजवर कुणालाही एवढे लिड मिळालेले नव्हते. आमदार आशुतोष काळे यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी विवेक कोल्हे आपल्यासमोर निवडणूकीला उभे असतील, हे गृहित धरले होते. त्यांनी गेली पाच वर्षे विकास कामांचा सपाटा लावला. तीन हजार कोटींची विकास कामे मतदारसंघात केली. त्यांनी केलेला हा दावा व झालेली कामे मतदारांच्या समोर होती. त्यामुळे मतदारांनीही त्यांना भरघोस मते दिली. कोल्हे यांनी पक्षादेशानंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या पथ्थ्यावर पडला. कोल्हे कुटुंब निवडणुकीत काम करेल का, अशी शंका व्यक्त होत होती. परंतु कोल्हे यांनी महायुतीचा धर्म पाळल्याचे काळे यांच्या मताधिक्यावरून दिसून येते. काळे यांच्या प्रचारात माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, विवेक कोल्हे दिसले नाही. मात्र, त्यांनी कार्यकर्त्यांना महायुतीसोबत राहण्याच्या सूचना केल्या. त्या सूचनांचे तंतोतंत पालन कार्यकर्त्यांनी केल्याचे निकालावरून दिसून आले. कोपरगाव शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न आमदार आशुतोष काळे यांनी सोडवला, हे देखील विजयाचे प्रमुख कारण ठरले. कोपरगाव शहराला नेहमीच आठ दिवसांतून एकदा पाणी येत होते, उन्हाळ्यात तर २०-२२ दिवसांवर पाणी पुरवठा केला जात होता. काळे यांनी पाच नंबरचा साठवण तलाव बांधला व त्याशिवाय १३१ कोटींची योजना कार्यान्वित केली. त्यामुळे आता कोपरगाव शहराला तीन दिवसाआड पाणी येत अहे. आमच्या डोक्यावरील हंडा आमदार काळे यांनी उतरवल्याची भावना महिलांमध्ये होती, त्याशिवाय लाडकी बहिण योजना देखील प्रभावी ठरली. महिला वर्गाने काळे यांनी भरभरून मतदान केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)