53 कोटी द्या, 63 जागांवरील EVM हॅक करतो:विधानसभा निवडणुकीत हॅकर्सची महाविकास आघाडीच्या एका खासदारापुढे ऑफर

6 days ago 2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवसच उरलेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यातच एका अमेरिकन हॅकरने महाविकास आघाडीच्या एका खासदारापुढे अवघ्या 53 कोटींत 63 जागांवरील ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र हॅक करुन देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सदर खासदाराने ही बाब पोलिसांच्या कानावर घातली असून, पुढील तपास सुरू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सय्यद शुजा असे ईव्हीएम हॅक करण्याचा प्रस्ताव ठेवणाऱ्या हॅकर्सचे नाव आहे. तो स्वतःला व्हिसलब्लोअर म्हणवतो. त्याच्या मते, तो अमेरिकन संरक्षण विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे. त्याने तेथील तंत्रज्ञानाच्या मदतीने ईव्हीएम मशीन हॅक करण्याचा दावा करत आहे. यासाठी तो महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधून त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवत आहे. त्याने नुकतेच एका खासदाराशी संपर्क साधून 53 कोटींच्या मोबदल्यात 63 जागांवरील ईव्हीएम हॅक करून देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. वृत्तवाहिनीच्या मदतीने हॅकरशी पुन्हा संपर्क या घटनेनंतर सदर खासदाराने एका वृत्तवाहिनीच्या टीमशी संपर्क साधून सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर सदर वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सदर खासदाराचा खासगी सचिव बोलत असल्याचे सांगून सय्यद शुजाशी संपर्क साधला. त्यानंतर त्याच्या दाव्याची पडताळणी करण्यात आली असता त्याच व्यक्तीने काही वर्षांपूर्वी सरकारवर ईव्हीएम हॅक करून निवडणूक प्रभावित करण्याचा आरोप केल्याचे निदर्शनास आले. आता हा व्यक्ती आपण स्वतः ईव्हीएम हॅक करू शकतो असा दावा करत आहे. त्याने सदर खासदारांसाठी महाराष्ट्रातील 63 जागांवरील ईव्हीएम हॅक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी त्याने 53 कोटी रुपयांच्या मोबदल्याची मागणी केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हॅकर सय्यद शुजाने ईव्हीएम हॅक करण्याचा दावा काही पहिल्यांदाच केला नाही. यापूर्वी 21 जानेवारी 2019 रोजी त्याने व्हिसीद्वारे लंडनमध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधित केले होते. मी 2009 ते 2014 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआयएल) व त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी विकसित करण्यात आलेल्या ईव्हीएमचा भाग होतो, असे तो म्हणाला होता. पण नंतर ईसीआयएल व निवडणूक आयोगाने शुजाचे आरोप फेटाळले होते. हे ही वाचा... महाराष्ट्राचे महाकांड 2: दलितांसमोर टिकू शकले नाही पेशव्यांचे सैन्य:कोरेगाव हिंसाचारानंतर दलित मतांची विभागणी; भाजप नेते म्हणाले- जुनी जखम उकरू नका तारीख, 1 जानेवारी 1818 ठिकाण- भीमा नदीच्या काठी वसलेले कोरेगाव 20 हजार घोडदळ, 8 हजार पायदळ आणि तोफखाना असलेले पेशवा बाजीराव द्वितीय यांचे सैन्य कोरेगावजवळ तळ ठोकून होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सुमारे 800 सैन्य नदीच्या पलीकडे तैनात होते. बाजीरावांनी 2 हजार सैनिकांच्या तुकडीला ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला. हल्ल्यासाठी सैन्याने तोफांचा ताबा घेतला. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article