61 पैकी 51 कंपन्या भारतातीलच, करार मात्र दावोसला:गुंतवणूक करार केलेल्या 43 कंपन्या मुंबई-पुण्याच्या, काहींची कार्यालये मंत्रालयापासून 20 किमीवर
4 hours ago
1
दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत फडणवीस सरकारने महाराष्ट्रात गुंतवणुकीचे १५.७० लाख कोटींचे सामंजस्य करार केले. यातून १५.९५ लाख रोजगार निर्मितीचा दावा केला जात आहे. मात्र यापैकी केवळ २.१७ लाख कोटींचे करारच परदेशी कंपन्यांसोबतचे आहेत. एकूण ६१ उद्योगांपैकी दहाच कंपन्या विदेशातील व ५१ भारतीय आहेत. ४३ कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यापैकी ३९ तर मुंबई- पुण्यातील असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या तपासणीत समोर आलेे. आश्चर्य म्हणजे, मंत्रालयापासून २० ते २५ किमीवर असलेल्या वांद्रे, वरळीत ज्या कंपन्यांची मुख्यालये आहेत त्या कंपन्यांशी करार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ६५०० किलोमीटरवर दावोस गाठले. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये २० ते २४ जानेवारी दरम्यान आयोजित आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्यासह तब्बल २० जणांची टीम गेली होती. यात करार झालेल्या गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीचे आकडे आकर्षक आहेत. मात्र या परिषदेतून परदेशातील गुंतवणूक राज्यात आणणे अपेक्षित असताना राज्य आणि देशातील उद्योगांसोबत करार करण्यातच महाराष्ट्राने धन्यता मानली. अन्य राज्यातील कंपन्यांशी करार ओडिशा- बालासोर अलॉय लि., चंदीगड- अवनी पॉवर बॅटरीज, जेन्सोल, हरियाणा- ऑलेक्ट्रा ईव्ही- हैदराबाद, ग्रिटा एनर्जी-चेन्नई, इंडोरामा- हरियाणा, सॉटेफिन भारत, कोलकाता परदेशी कंपन्या एबी इनबेव, बेल्जियम- 750 कोटी, ब्लॅकस्टोन, अमेरिका, 25,000 कोटी, झेड आर टू समूह, अबूधाबी-17,500 कोटी, ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज-15,000 कोटी, अमेरिका, ब्लॅकस्टोन-43,000 कोटी, न्युयॉर्क, सिलॉन बिव्हरेज- 1039 कोटी, श्रीलंका, टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट- 43,000 कोटी, सिंगापोर, अॅमेझॉन- 71,795 कोटी, अमेरिका, युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंबगहॅम -यूके, क्रॉसरेल इंटरनॅशनल-यूके. महाराष्ट्रातील ४३ कंपन्या : मुुंबई २९, पुण्यातील १० मुंबई : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर विराज प्रोफाइल्स जेएसडब्ल्यू वारी एनर्जी टेम्बो एल माँट पंचशील रिॲल्टी बिस्लेरी इंटरनॅशनल एस्सार बुकमायशो वेलस्पून सिएट टाटा युनायटेड फॉस्फरस इरू लर्निंग सोल्युशन्स रिलायन्स इंडस्ट्रीज वर्धान लिथियम लार्सन अँड टुब्रो नेल्सन प्रियम सोल्युशन्स रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक हॅझेरो इंडस्ट्रीज हिरानंदानी एव्हरस्टोन एमटीसी रहेजा ग्रुप रिग्रीन रोनी स्क्रूवाला एटीसी ग्रुप. पुणे : कल्याणी एच टू ई पॉवर ब्ल्यू एनर्जी मोटर्स रुरल एन्हान्सर्स फ्युएल टॉरल इंडिया गुरुकुल फ्लूड कंट्रोल अकोलेड इलेक्ट्रॉनिक्स स्कायरुट व्हेंचर्स नागपूर : इकॉनॉमिक एक्स. लि. एमएसएन होल्डिंग्ज लि.
रत्नागिरी : व्हीआयटी सेमिकॉन्स या कंपनीचा समावेश आहे. ६१ कंपन्यांशी झाले करार दिव्य मराठीने ६१ करारबद्ध झालेल्या कंपन्यांचे पत्ते तपासले. यात १० परदेशी, ४३ महाराष्ट्रातील, ८ अन्य राज्यातील. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून नेली सहा हजार कोटींची गुंतवणूक आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये असताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी गुरुवारी मुंबईत येऊन महाराष्ट्रातून ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्या छत्तीसगड राज्यात नेली. साय म्हणाले की, मुंबई, दिल्ली व रायपूर येथील उद्योगपतींसोबत आयोजित ‘इन्व्हेस्टर्स कनेक्ट मीट’मध्ये एकूण १ लाख कोटी गुंतवणुकीचे करार केले आहेत. यात महाराष्ट्रातील ६ हजार कोटींचा समावेश आहे. अंबुजा सिमेंट- २,३६७ कोटी, बॉम्बे हॉस्पिटल- ७०० कोटी, प्लास्टिक आणि कापड क्षेत्रातील वेलस्पून ग्रुप- ५०० कोटी, पाळीव प्राण्यांचे खाद्य उत्पादन करणारी ड्रूल्स कंपनी-६२५ कोटी, क्रिटेक आयटी टेक्नॉलॉजी- ६०० कोटी, नॅनटेक्स मशिनरी- ४५ कोटी, नॅनटेक्स इंडस्ट्रीज ३९.५० कोटी, पीडिलाइट- ८० कोटी व व्हिजन प्लस सिक्युरिटी ५० कोटी गुंतवणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)