संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय. पोटदुखीमुळे वाल्मिक कराडला जिल्हा रूग्णालयात दाखल केलं असून सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
सपरंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड थेट आयसीयूमध्ये पोहोचलाय. बीडच्या जिल्हा रूग्णालयात वाल्मिक कराडला दाखल करण्यात आलंय. पोटदुखीच्या त्रासामुळे वाल्मिक कराडचा बीडच्या सेंट्रल जेलमधून रात्री जिल्हा रूग्णालयात दाखल केलं होतं त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याची रवानगी बीडच्या सेंट्रल जेलमध्ये झाली. पण काही वेळाने त्याला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने जेलमधून काढून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तर वैद्यकीय कारणातून वाल्मिक कराडला मारून टाकतील, अशी भिती भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर देखील गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. बुधवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर सीआयडीने पोलीस कोठडीची मागणी केली नाही. वाल्मिक कराडच मास्टरमाईंड असल्याचा आरोप होतोय. श्वसनाचा आजार असल्याचे आधीच कराड कोर्टात सांगितलं. श्वसनाच्या आजारामुळे सी पॅप मशिन वापरण्यास कोर्टाने परवानगी दिली. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमुळे बीडच्या सेंट्रल जेलमध्ये आणलंय. पण मध्यरात्री त्याची तब्येत बिघडल्यानंतर ब्लडप्रेशर आणि शूगरची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केलं. सध्या त्यावर त्याच्या उपचार सुरूये. त्यामुळे डॉक्टरांकडून ग्रीन सिग्नल मिळेपर्यत तो रूग्णालयातच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: Jan 24, 2025 11:15 AM