पातूर (Akola):- दरवर्षी प्रमाणे यावर्षीही बु. गोवर्धनजी पोहरे बहुउद्धेशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ पातूर र. न. एफ. 9359 भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त (Bhima Koregaon Bravery Day) भव्य प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन पातूर शहरात करण्यात आले होते.
शौर्य दिनानिमित्त भव्य प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न
निर्भयभाऊ पोहरे मित्रपरिवार, पातूरच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अनिरुध्द वनकर यांचा भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भव्य प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता नगर परिषद खेळाचे नियोजीत मैदान,पातूर येथे करण्यात आले असून शहरासह तालुक्यातील ग्रामस्थांनी या बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड, कार्यक्रमाचे उदघाटक शामकुमार शिरसाम तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र पातोडे, प्रकाश तायडे, सम्राट सुरवाडे,जिवन डीगे, आकाश सिरसाट,देवेश पातोडे होते.तर प्रमुख उपस्थितीत न.प.मुख्याधिकारी सै. अहसानोद्दीन,पोलीस उपनिरीक्षक रविंद्र लांडे होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्भय पोहरे,स्वप्निल सुरवाडे,प्रवीण पोहरे,मंगेश गवई, निहार घुगे, धीरज खंडारे, रवी उपर्वट, विकास सरदार, प्रशिक इंगळे, उमेश गवई, प्रविण किरतकार व निर्भयभाऊ पोहरे मित्र परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.