नागरी सत्कार समारंभात अप्पा शिंदे यांचा सत्कार करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.Pudhari News Network
Published on
:
31 Jan 2025, 7:25 am
Updated on
:
31 Jan 2025, 7:25 am
कल्याण : कोरोना काळात औषधांचा तुटवडा असताना माणुसकीचा झरा सतत वाहत जाणारा अप्पा देवदूत होते. अश्या काळात खर्या अर्थाने औषधापेक्षा मोठे होत, त्यावेळी प्रत्येक माणसाच्या पाठीशी उभे राहणे. पक्षभेद विसरून राजकारण विरहित राजकारणाच्या पलिकडे मैत्री जपणारा माणूस कोण असेल तर त्याचे नाव अप्पा शिंदे त्यांचे जीवन म्हणजे कार्यशिलता, समर्पण आणि समाजसेवेचे प्रतीक असे गौरोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणात नागरी सत्कार समारंभात व्यक्त केले.
कल्याणात केमिस्ट हृदय सम्राट मा.आमदार जगन्नाथ ऊर्फ अप्पा शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी 75 वा वाढदिवसा निमित्त कल्याण पूर्वे येथील पोटे मैदानात कल्याणकरांच्या वतीने अमृत पूर्व नागरी सोहळा समितीने आमदार जगन्नाथ ऊर्फ अप्पा शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला होता.
या सत्कार सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आ. राजेश मोरे, आ. किसन कथोरे, सुलभाताई गायकवाड, पालिका आयुक्त इंदूराणी जाखड, सत्कार समितीचे माजी नगरसेवक निलेश शिंदे, प्रशांत काळे, माजी नगरसेवक नवीन गवळी, सचिन पोटे, रवि पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच देशभरातील मेडिकल क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की मा.आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या सत्कार सोहळ्या निमित्त्त अप्पांना औषध विरहित दीर्घायुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त करतो. त्याचं कर्तव्य खूप मोठे आहे आणि ते सर्वाचे लाडके अप्पा आहेत. चोवीस तास औषधाच्या गराड्यात राहून निरोगी व ठणठणीत बरे रहा, आम्हाला शतकमहोत्सवी सेंच्युरी साजरी करण्याची संधी मिळावी अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.
औषधापेक्षा हवा होता माणुसकीचा आधार
कोरोना काळात खर्या अर्थाने औषधापेक्षा मोठे होते म्हणजे त्यावेळी प्रत्येक माणसाच्या पाठीशी उभे राहणे, हवा होता माणुसकीचा आधार. अप्पांनी त्याकाळात माणुकीच दर्शन देऊन प्रत्येकाच्या पाठीशी उभे होते. अप्पांचा राजकारणात कल जास्त होता. त्यापेक्षा त्यानी समाजकारणात व मेडिकल क्षेत्रात त्यानी काम केले. अप्पांना हलक्यात घेऊ नका, शेवटी ते शिंदे आहे. हे राजकारणात उभ्या देशाने व विदेशाने अडीच वर्षापूर्वी पाहिले असा इशारा एकनाथ शिंदे यांनी प्रतिस्पर्धी यांना यावेळी दिला.