CM Eknath Shinde: शरद मैंद यांच्या पुढाकाराने शेतक-यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट

1 hour ago 1

पुरग्रस्त शेतक-यांसाठी अतितात्काळ कार्यवाही करा

पुसद (CM Eknath Shinde) : ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी पुसद परिसरात अतोनात नुकसान झाले. नुकसान ग्रस्त झालेल्या अनेक गावांना तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शरद मैंद व त्यांच्या सहकार्यांनी पाहणी केली. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या भारती मैंद पतसंस्थेच्या माध्यमातुन पुरग्रस्त भागात अन्नधान्याच्या 2000 किट्स तसेच काही शेतकरी व शेत मजुरांना आर्थिक मदत व टीन पत्राचे वाटप केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला जिल्हाधिका-यांशी मध्यरात्री संपर्क

धनकेश्वर नगर मधील घर वाहून गेलेल्या मुक्या गीताबाईला घर बांधून दिले.पुरग्रस्त शेतक-यांच्या भावना मुख्यमंत्र्यां पर्यंत पोहचविण्यासाठी 19 सप्टेंंबर रोजी शरद मैंद यांच्या नेतृत्वात मोर्चा काढुन उपविभागीय अधिकाऱ्यां मार्फत निवेदन दिले. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांशी भेटुन शेतक-यांच्या व्यथा व झालेल्या नुकसानीची माहिती देणे गरजेचे होते. म्हणून आमदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातुन दि. 3 ऑक्टोबरला पुरग्रस्त शेतक-यांच्या शिष्ट मंडळासह शरद मैंद यांनी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री 12 वाजता भेट घेतली.

या प्रसंगी मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) नुकसानीचे वास्तव चित्रफितीद्वारे दाखवून पुरात खरडून गेलेली शेती पुर्ववत करणे, प्रवाह बदललेल्या नाल्यांना पुर्ववत करणे,खोलीकरण,रुंदीकरण तसेच पुरप्रतिबंधक भिंत बांधुन द्यावी अशी विनंती करण्यात आली. शिष्टमंडळाच्या विनंतीची त्वरीत दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना फोनवरून शासनाच्या योजनेतून शेतक-यांनी सांगितलेली कामे करावे असे सांगून शरद मैंद यांना जिल्हाधिका-यास भेटण्यास सांगितले.शिष्टमंडळात एड बालाजी कपटे, ज्ञानेश्वर हाके, दीपक तायवाडे,पंजाब भाकरे, वैभव ढोकणे,नाना खरात, ज्ञानेश्वर आभाळे,तेजस पाटील, विश्वास बाबूळकर, अवधुत कपटे, दर्शन मोडक,भागवत पुलाते, अमोल चिलकर, बाळु चिलकर सहभागी होते. पत्रकार परिषदेला साहेबराव ठेंगे,परमेश्वर जयस्वाल,अनिल ठाकूर नाना जळगावकर, दिपक जाधव,पंडितराव देशमुख, के.जी. चव्हाण सर,यशवंत चौधरी,सुभाष बोडखे साहेब, इश्तियाक भाई,सोमेश्वर जाधव,अजय पुरोहित,यू.एन.वानखेडे साहेब,संतोष आंभोरे, संदिप वट्टमवार,भारत जाधव, सुशील रोहडकर,उदय गंधेवार,ललित चव्हाण,नरेंद्र खंदारे, दिपक अवचार , उपस्थित होते

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article