Dhule :- मिशन ऑपरेशन ऑल आउट च्या अंतर्गत धुळे पोलिसांनी महामार्गावरून होणारी अवैध वाहतूक (Illegal traffic) रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. यामध्ये गेल्या महिन्याभरापासून पोलीस विविध प्रकारच्या वेगवेगळ्या कारवाई करत आहे.
वाहनांमध्ये लाखो रुपयांच्या अवैध दारूची वाहतूक
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या वाहतूक करणारा मोठ्या प्रमाणात दारू साठ्याची (Liquor stocks) तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाची कसून तपासणी (Inspection) केली असता पिकप वाहनांमध्ये लाखो रुपयांच्या अवैध दारूची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळेस पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. मात्र, पोलिसांनी खात्या दाखवतच त्यांनी गाडीमध्ये तब्बल साडेसहा लाख रुपयांचा दारू साठा असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चाळीसगाव पोलीस ठाण्यात(Police station) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा दारूसाठा (Liquor store) कुठून व कुठे जात होता याचा तपास पोलीस आता करीत आहे.