एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाल्याने आणि त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याने त्यांना ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांचे सिटीस्कॅन करण्यात आलं. या तपासणी झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज मंगळवारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना उपचारांसाठी ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र काही तपासणी केल्यानंतर ते रूग्णालयातून निघाले आहे. ज्युपिटर रूग्णालयातील चेकअपनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मी चेकअपसाठी आलो होतो, माझी प्रकृती उत्तम आहे.’, अशी पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच माध्यमांच्या प्रतिनिधींना दिल्याचे पाहायला मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाल्याने आणि त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याने त्यांना ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांचे सिटीस्कॅन करण्यात आलं. या तपासणी झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यापू्र्वी शिंदेंची डेंग्यूचा चाचणी करण्यात आली होती. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांना अशक्तपणा आणि पांढऱ्या पेशी कमी झाल्या असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यामुळे त्यांना पुन्हा आरामाचा सल्ला देण्यात आला आहे.निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाला होता. मात्र आजारी असताना देखील कोणत्याही आरामाशिवाय एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला होता. यादरम्यान, त्यांना भाषण करू नका, असा डॉक्टरांचा सल्ला दिला होता. मात्र तरीही त्यांना आराम न करता आपल्या प्रचारसभा, दौरे सुरूच ठेवले होते. नुकतेच निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आरामसाठी आपल्या मुळ गावी दरेगाव येथे दोन दिवसांसाठी गेले होते. तेथेही त्यांची प्रकृती बरी नसल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Dec 03, 2024 03:33 PM