Haryana Elections Vinesh Phogat: कुस्तीपटू विनेश फोगटचा विजय; भाजपचा मोठा पराभव

2 hours ago 1

‘हा प्रत्येक स्त्रीचा लढा, हा प्रत्येक संघर्षाचा, सत्याचा विजय’: विनेश फोगट

जुलाना (Haryana Elections Vinesh Phogat) : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Elections) मतमोजणी प्रक्रिया सुरू असून, हरियाणाच्या जवळपास सर्व 90 विधानसभा जागांवर हळूहळू विजय-पराजय असे समीकरण तयार होत आहे. दरम्यान, जुलाना विधानसभा मतदारसंघातून कुस्तीपटू (Vinesh Phogat) विनेश फोगट विजयी झाल्या आहेत. कुस्तीपटू विनेश फोगटने भाजपच्या योगेश कुमारचा सुमारे 65 हजार मतांनी पराभव केला आहे. यावेळी दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती. कुस्तीपटू विनेश फोगटने या (Haryana Assembly Elections) निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. (Vinesh Phogat) विनेश फोगटला तिच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

जुलानामधून विजयी झाल्यानंतर विनेश फोगट झाली भावूक

जिंदच्या जुलानामधून विजयी झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार विनेश फोगट (Vinesh Phogat) म्हणाल्या की, हा प्रत्येक मुलीचा, लढण्याचा मार्ग निवडणाऱ्या प्रत्येक महिलेचा लढा आहे. हा प्रत्येक संघर्षाचा, सत्याचा विजय आहे. या देशाने मला दिलेले प्रेम आणि विश्वास मी कायम ठेवीन.”

हरियाणा विधानसभा निवडणुकीची (Haryana Elections) मतमोजणी सुरू असून, सध्या मतमोजणीत भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. हरियाणातील निवडणुकीच्या निकालाचा सुरुवातीचा कल काँग्रेसच्या बाजूने होता, तेव्हापासून परिस्थिती सतत बदलताना दिसत आहे. जिथे आता भाजप हळूहळू पुढे जात असून, पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. (Haryana Elections) हरियाणात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन झाल्याचे दिसते, हा एक मोठा विक्रम असेल. सध्या भाजपला 50 जागा मिळत असून, काँग्रेसला 35 जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र, अद्याप निकाल पूर्णपणे स्पष्ट झालेला नसून, (Haryana Assembly Elections) हरियाणात कोठे कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय निकालानंतरच होणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article