Ideal Couple Award: मालती व संदीप शेळके यांना आदर्श दाम्पत्य पुरस्कार!

1 hour ago 1

बुलढाणा (Ideal Couple Award) : मेहकर येथील जनस्वप्नपूर्ती परिवाराच्या वतीने सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रातही धडाडीने काम करणारे दाम्पत्य म्हणून मालती व संदीप शेळके यांना “आदर्श दाम्पत्य पुरस्कार” (Ideal Couple Award) रविवार 22 सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला. सुखी सहजीवन जगत असतांना आदर्श दाम्पत्याचा सन्मान मिळाला, याचा आनंद असल्याच्या भावना (Malati Sandeep Shelke) मालतीताईंनी यावेळी व्यक्त केल्या.

मेहकर येथील के. व्ही. प्राइडमध्ये हा सोहळा पार पडला. खऱ्या अर्थाने आदर्श दाम्पत्य (Ideal Couple Award) म्हणता येईल, असे सेवासंकल्प परिवाराचे डॉ. नंदकुमार पालवे आणि डॉ. आरती पालवे यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, सुलतानपूर येथील श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमराज लाहोटी, उद्योजक अविनाश वतारी, नित्यानंद अनाथ आश्रमाचे अनंत शेळके, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, शाखा अभियंता जे. एम. दांदडे, उद्योजक उदय सावजी, शासकीय ठेकेदार रमेश काटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article