Illegal tobacco sellers: जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची अवैध तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

2 hours ago 1

हिंगोली (Illegal baccy sellers) : सर्व शासकीय कार्यालये व शाळांचा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणे तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा शल्य चिकित्सक तथा सदस्य सचिव राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉ. नितिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ऑक्टोबर रोजी जिल्हा तंबाखू नियंत्रण पथक व जिल्हा पोलिस यांनी शहरातील रिसाला बाजार, अकोला बायपास, आदर्श महाविद्यालय परिसर येथील सार्वजनिक ठिकाणी अवैद्य तंबाखू विक्रेत्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन उल्लंघन करणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही केली. तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार सर्व सार्वजनिक परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ खाणे, थुंकणे, बाळगणे आणि शाळा/महाविद्यालय, शासकीय कार्यालये यांच्या १०० मीटरच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थाची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.

त्यानुसार हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाडाळकर यांच्या सहकार्याने पोलीस अमलदर चंद्रशेखर देशमुख, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगरचे मंगेश गायकवाड, व जिल्हा रुग्णालयातर्फे कुलदीप केळकर, आनंद साळवे व इतर कर्मचारी ह्यांच्या पथकाने बुधवारी परिसरातील ठिक-ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व पान टपऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. ह्या कार्यवाहीत एकूण १२ लोकांकडून रु. ४६००/-एवढा दंड वसूल करण्यात आला.

कोटपा 2003 च्या नुसार कारवाई

कलम 4 – सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आहे.
कलम 5 – तंबाखूयुक्त पदार्थ जाहिरात बंदी
कलम 6 – ‘अ’ 18 वर्षा खालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकण्यास सक्त मनाई.
कलम 6 ‘ब’ शै. संस्थांच्या 100 मी. परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री, सेवन बंदी
कलम 7 – कोणत्याही तंबाखूयुक्त पदार्थावर (पाकिटावर) कर्करोगविषयी चेतावणी पाकिटाच्या 85 % भागावर असावी.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article